• Home
  • News
  • increase the fees of Web Series artists; Over 100 new shows coming soon

वेबसिरीज / वेबसिरीज कलाकारांच्या शुल्कात चारपट वाढ; लवकरच 100 पेक्षा जास्त नवे शो 

यांना सर्वात जास्त शुल्क मिळत आहे

विशेष प्रतिनिधी

Sep 15,2019 09:43:00 AM IST

किरण जैन | मुंबई
नेटफ्लिक्स, अॅमेझॉन आणि हॉटस्टारसारख्या ओटीटी प्लॅटफाॅर्म (ओव्हर द टॉप)चा वापर देशभरात वेगाने वाढत आहे. नुकतेच मो-मॅजिकद्वारा करण्यात आलेल्या सर्व्हेत देशात ५५ टक्के लोक ओटीटी प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ बघतात हे दिसून आले आहे. तर दुसरीकडे या प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येणाऱ्या वेबसिरीजच्या कलाकारांच्या शुल्कातही वाढ होत आहे. १०० पेक्षा जास्त नवीन कार्यक्रमांवर कामही सुरू आहे. जे पुढील ६ ते ८ महिन्यांत येतील. अभिनेता सैफ अली खानने नेटफ्लिक्सची वेबसिरीज सेक्रेड गेम्ससाठी सुमारे ८ कोटी रुपये घेतले होते. नुकत्याच आलेल्या दुसऱ्या सीझनसाठी त्याने वीस टक्के शुल्क वाढवले होते.


वेबसिरीज मिर्झापूरमध्ये गुड्डूभय्याच्या वकिलाच्या वडिलांच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेले राजेश तेलंग सांगतात की, वेबसिरीजमध्ये मोठ्या कलाकारांना सोडून जे प्रसिद्ध अभिनेते आहेत, जे मुख्य भूमिकेत असतात, त्यांना ५० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत मिळतात. माझ्याबाबतीत बोलायचे तर गेल्या दोन-तीन वर्षांत माझे शुल्क चारपट वाढले आहे.


नवाजुद्दीननेही सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सिझनसाठी २ कोटी रुपये घेतले होते. मात्र, दुसऱ्या सीझनसाठी त्याने साडेतीन कोटी रुपये घेतले होते. वेगवेगळ्या वेबसिरीजमध्ये अभिनयाचे कौतुक मिळवणारी राधिका आपटे सांगते की, मला वाटते की आम्ही अशी वेबसिरीज बनवतो की जिला वैश्विक मागणी आहे. यामुळे जगभरातील लोक ती पाहतात. कमीत कमी कलाविश्वात आर्ट कुठे ना कुठे तरी गायब होत चालल्याचे दिसते. यामुळे मला वाटते की हे चांगले पाऊल आहे. मात्र, मला पैशांपेक्षा जास्त वेबसिरीजची कन्सेप्ट महत्वाची आहे. बॉलीवूड आणि वेबसिरीजमध्ये दमदार अभिनयाच्या जोरावर वेगळे स्थान निर्माण करणारा पंकज त्रिपाठी ‘मिर्झापूर’च्या दुसऱ्या सीझनमध्ये व्यग्र आहे. सूत्रांनुसार, पंकजने जेव्हा अभिनयाला सुरुवात केली होती तेव्हा ५ लाखांत चित्रपट स्वीकारायचा आणि आता तो ३ कोटींपेक्षा कमी शुल्क घेत नाही. वेबसिरीजच्या जगातही पंकजने भरारी घेतली आहे. ‘सेक्रेड गेम्स’ साठी त्याने १ कोटी रुपये घेतले होते, तर ‘क्रिमिनल जस्टिस’साठी दुप्पट शुल्क केले आहे.


100 पेक्षा जास्त भारतीय वेबसिरीजवर काम सुरू आहे
कबीर खान, अली अब्बास जफर, एकता कपूर, एक्सेलसह अनेक निर्माते १००पेक्षा जास्त वेब शो आणत आहेत. नेटफ्लिक्स १६ ओरिजनल वेबसिरीजवर काम करत आहे. अॅमेझॉन सध्या १२ वेबसिरीजवर काम करीत आहे. एकटे अॅपलॉज एंटरटेनमंेट एकूण ४५ वेबसिरीज करत आहे. एक डझनपेक्षा जास्तवर एकता कपूर काम करीत आहे. २० वर रितेश सिधवानी तर फरहान अख्तरची कंपनी एक्सेल काम सुरू करेल. अॅपलॉज एंटरटेनमेंटचे प्रमुख समीर नायक यांनी सांगितले की, ८-१० वेबसिरीजवर काम सुरू आहे. ६-८ वेबसिरीज लगेच तयार होतील.

X
COMMENT