आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावजन वाढवण्यासाठी हिवाळा सर्वात चांगला मानला जातो. या वातावरणात पौष्टिक आहार घेतल्याने वजन लवकर वाढते. ग्रेटर कैलाश हॉस्पिटलचे चीफ क्लीनिकल डायटीशियन डॉ. विनिता जायसवाल वजन वाढवणाऱ्या ५ पौष्टिक पदार्थांविषयी सांगत आहेत. हे पदार्थ खाल्ल्याने वारंवार भूक लागते. हे योग्य प्रकारे खाल्ल्यास वजनही लवकर वाढते.
काजू : यामध्ये हाय कॅलरी आणि चांगले फॅट्स असतात. काजू तुपामध्ये फ्राय करून खावे. यामुळे वजन वाढते.
दही : यामधील चांगल्या बॅक्टेरियामुळे जास्त भूक लागते. साय असेलेले दही खा. यामुळे वजन वाढते.
डाळिंब : यामधील अँटिऑक्सिडंट्समुळे भूक वाढते. दिवसातून एक ग्लास डाळिंबाचा ज्यूस पिल्याने वजन लवकर वाढते.
केळी : यामध्ये शुगर आणि कॅलरी जास्त असतात. यामुळे वजन वाढते. दुधासोबत केळी खाल्ल्याने फायदा होतो.
संत्र्याचा ज्यूस : यामध्ये हाय कॅलरी आणि साखर असते. यामुळे वजन वाढते. रोज एक ग्लास संत्र्याचा ज्यूस पिल्याने फायदा होतो.
वजन कमी होण्याची कारणे
तणाव असल्याने : तणावामध्ये राहिल्याने हार्मोनच्या स्तराचे संतुलन राहत नाही. यामुळे भूक लागत नाही.
मासिक पाळी आल्यावर : मासिक पाळीच्या काळात शरीरामध्ये हार्मोनल बदल होतात. या काळामध्ये भूक कमी लागते आणि वजनही कमी होते.
औषधी घेतल्याने : अनेक प्रकारचे औषध घेतल्याने पचनक्रिया खराब होते. यामुळे भूक कमी लागते. जेवणात मन लागत नाही.
पोट खराब झाल्यामुळे : पोटाची समस्या दीर्घकाळ राहत असेल तर भूक कमी लागते. यामुळे वजनही कमी होते.
हेदेखील लक्षात ठेवा
- पवनमुक्तासनसारखी योगासने करा. यामुळे पचनक्रिया चांगली राहते. जास्त भूक लागते.
- आहारामध्ये चीज आणि बटरसारख्या पदार्थांचा समावेश करा. यामुळे वजन वाढते.
- सुका मेेव्याचे सेवन केल्यानंतर दूध प्यावे. यामुळेही लवकर वजन वाढते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.