आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशरद पाण्डेय
नवी दिल्ली- राजस्थानातील वैज्ञानिक नितीन गुप्ता यांची इस्त्रोमध्ये २००८ साली निवड झाली. परंतु २०११मध्ये नोकरी सोडून शेतकरी झाले. त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या दूर करायच्या होत्या.
नितिनचे मित्र शेती करतात. सुट्यांत नितिन गावात येत तेव्हा पंचायत लागायची. गावकरी एकत्र बसून शेती व त्यासंबंधीच्या अडचणीवर चर्चा करत असत. नितीन समस्यांवर तोडगा सांगतात. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी नवे संशोधन करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. एका मित्राच्या मदतीने त्यांनी पहिले कापूस वेचणी यंत्र तयार केले. हे उपकरण तयार करण्यासाठी त्यांना दोन वर्षे लागली. परंतु यश मिळाले नाही. नंतर डोंगराळ भाग उदा. जम्मू-काश्मीर, लेेह-लडाख व हिमाचल प्रदेश आदी भागात जाऊन संशोधन केले. तेथील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. चार महिन्यानंतर सफरचंद तोडणी करण्याचे यंत्र तयार केले. येथील शेतकऱ्यांना ते खूप आवडले. अशा प्रकारची एक-एक करून पाच प्रकाराची यंत्रे तयार केली. या उपकरणांना इस्त्रायल, आॅस्ट्रेलिया, अमेरिकेतून मागणी येऊ लागली. त्यांच्या संशोधनांना फिक्कीने बिझनेस इनोव्हेशन अवॉर्डने सन्मानित केले आहे. याशिवाय सीआयआय टेक्निकल इनोव्हेशन इन अॅग्रिकल्चरल अवॉर्ड मिळाले आहे.
देशातील पहिले लिंकेज व्हेजिटेबल यंत्र तयार
वैज्ञानिक नितिन गुप्ता म्हणाले, ज्या प्रकारचे तंत्र बाजारात उपलब्ध नसते, अशी उपकरणे आपण तयार करतो. एका हंगामात या यंत्राची किंमत वसूल झाली पाहिजे, असे यंत्र आपण तयार करतो. नुकतेच देशात तयार केलेले पहिले मार्केट लिंकेज व्हेजिटेबल फ्रूट ग्रेडिंग यंत्र तयार केले आहे. या यंत्रामुळे फळे व भाज्यांची कापणी होताच आजूबाजूच्या आडत्यांकडे रंग, आकार, गुणवत्तेची माहिती जाते. त्यांना गरज पडल्यास ते शेतकऱ्यांशी संपर्क साधू शकतात.
नितिन गुप्ता श्रीगंगानगरच्या श्रीकरणपूर गावचे रहिवाशी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण याच गावात झाले. तर यांत्रिकी शाखेचे शिक्षण त्यांनी चेन्नईत घेतले. इस्त्रोमध्ये २००८ मध्ये वैज्ञानिक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. २०११ मध्ये नोकरी सोडून त्यांनी मास्टर ऑफ डिझाइनची पदवी मिळवली. स्वत:चे स्टार्टअप सुरू केले. २०१५ मध्ये पंतप्रधानांच्या स्कील इनोव्हेशनमध्ये देशातील टॉप-३५ स्टार्टअपमध्ये त्यांची निवड झाली. नितिन यांनी कापूस वेचणी, सोलर इनसेक्ट ट्रॅप, सी बकथॉर्न पिकर व मार्केट लिंकेज ग्रेडिंग मशीन तयार केली आहे. पहिल्या मंगळयान मोहिमेत संशोधन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.