आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढत्या लोकसंख्येचे आकडे पाहता देशात प्रत्येक तीन महिन्यात एक इस्रायल, सहा महिन्यांत एका स्वित्झर्लंडची आणि वर्षात एका ऑस्ट्रेलियाएवढ्या लोकसंख्येची भर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - देशातील वाढती लोकसंख्या ही एकप्रकारे राष्ट्रीय आणीबाणीच आहे.  त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणासाठी युद्धपातळीवर कार्य करणे गरजेचे असून यासाठी एका आयोगाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणीी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी राज्यसभेत केली.


डॉ. महात्मे म्हणाले, लोकसंख्येचा विचार करताना दोन प्रकारच्या विचारधारा देशात आहेत. त्यात देशाजवळ सर्वात मोठे मनुष्यबळ असणे देशाच्या फायद्याचे असल्याचे सांगणारा एक विचार आहे, तर वाढती लोकसंख्या देशासाठी नुकसानकारक असल्याचे मानणाराही एक वर्ग आहे. या विचाराला आपले समर्थन असून आमची संसाधने, नोकऱ्यांची संधी, गरजा आणि लोकसंख्येच्या प्रमाणात कुठलेही संतुलन नाही. गरीब किंवा आर्थिक कमजोर कुटुंबांमध्ये मुलांची संख्या जास्त असल्याचे आजवर निदर्शनास आले आहे. त्याचा परिणाम म्हणून मुलांचे पालनपोषण, शिक्षण शक्य होत नाही. कुपोषणाची समस्या निर्माण होते, तर दुसरीकडे शिक्षित कुटुंबांमध्ये संसाधने असूनही मुलांची संख्या एक किंवा दोन एवढीच असते. यामुळे सामाजिक विषमता वाढत आहे. 

 

दर ३ महिन्यांत इस्रायलच्या लोकसंख्येइतकी पडते भर
वाढत्या लोकसंख्येचे आकडे पाहता देशात प्रत्येक तीन महिन्यात एक इस्रायल, सहा महिन्यांत एका स्वित्झर्लंडची आणि वर्षात एका ऑस्ट्रेलियाएवढ्या लोकसंख्येची भर पडत आहे, याकडे डॉ. महात्मे यांनी लक्ष वेधले. या समस्येवर युद्धस्तरावर उपाययोजना होणे आवश्यक असून त्यासाठी एका आयोगाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.