आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिमॅच्योर डिलिव्हरीनंतर झाला मुलीचा जन्म, एक-दोन तासच जगेल अशी होती भीती, पण डॉक्टरांनी केले असे काही की बनले हिरो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गूनहेवर्न - इंग्लंडच्या कॉर्नवालमध्ये राहणाऱ्या एका महिलेने प्रिमॅच्योर डिलिव्हरीनंतर एका मुलीला जन्म दिला होता. सहा महिन्यांनंतर गर्भात बाळाचा विकास होत नव्हता. त्यामुळे ऑपरेशन करावे लागले. असे बाळ तासभरापेक्षा जास्त काळ जगत नाही. पण बाळाला जन्मानंतर गर्मी मिळावी म्हणून डॉक्टरांनी असे काही केले की त्या बाळाचा जीव वाचला आणि काही दिवसांत ते बाळ पूर्ण निरोगीही झाले. 


पॉलिथिन बॅगची कमाल 
- इंग्लंडच्या कॉर्नवालमध्ये राहणारी फ्लॉरिस्ट शेरोन ग्रँट (37) ऑक्टूबर 2015 मध्ये प्रथमच आई बनणार होती. त्यावेळी तिच्या प्रेग्नंसीला 28 आठवडे म्हणजे 6 महिनेच झाले होते. 
- गर्भात असताना बाळाचा विकास होत नव्हता. त्याला पोषक तत्वे मिळत नव्हती. त्यामुळे बाळ अशक्त बनले होते. त्याचदरम्यान डॉक्टरने शेरोनचे ऑपरेशन करून प्रिमॅच्योर डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला. 
- डिलिव्हरीनंतर मुलीचा जन्म झाला. तिचे नाव पिक्सी ग्रँट असे ठेवण्यात आले. जन्मानंतर बाळाची अवस्था वाईट होती. वजन फक्त अर्धा किलो होते. आईच्या हातापेक्षाही बाळाचा आकार लहान होता. डॉक्टर्सला वाटते ते बाळ एक दोन तासांपेक्षा जास्त जगणार नाही. 
- जन्मापासूनच बाळाला ICU मध्ये ठेवण्यात आले. त्यावेळी बाळाच्या शरिराचे तापमान अत्यंत कमी होते. त्यानंतर बाळाचा जीव वाचवण्यासाठी आणि बाळाला गर्मी मिळावी म्हणून डॉक्टरांनी एक शक्कल लढवली. डॉक्टरांनी त्या बाळाला सँडविच बॅग (पॉलीथिन) मध्ये ठेवले. त्यामुळे बाळाच्या शरिराला आईच्या गर्भासारखे वातावर मिळाले. 
- काही दिवस पॉलिथीन बॅगमध्ये ठेवल्यानंतर बाळाच्या तब्येतीत चांगली सुधारणा झाली. इन्फेक्शन आणि इतर त्रासही कमी झाला. काही महिन्यातच बाळ घरीही गेले. पाच महिन्यांनंतर ते बाळ साधारण बाळासारखे जगले. 
- डॉक्टर्सच्या स्मार्टनेसमुळे बाळाचा जीव वाचला.  ज्या स्माकी जिस स्मार्टनेस की वजह से बच्ची की जान बची। उसे जानने के बाद मां-बाप डॉक्टर्स को दुआएं दे रहे हैं, वहीं हर कोई जानने वाला उनकी तारीफ किए बिना नहीं रह पाता।

 

बातम्या आणखी आहेत...