आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्याच्या कडेला रद्दीवर रोज काहीतरी लिहायचा हा भिकारी, एका महिलेचे लक्ष गेल्यावर समोर आले भिकाऱ्याचे सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायमुंडोची कविता वाचल्यानंतर शाला. - Divya Marathi
रायमुंडोची कविता वाचल्यानंतर शाला.

ब्राझील - ब्राझीलच्या रस्त्यांवरील एक भिकारी अचानक स्टार बनला. राइमुंडो अरुडो नावाची ही व्यक्ती 35 वर्षांपासून रस्त्याच्या कडेला बसत होती. तेथून जवळच राहत असलेली एक महिला दररोज त्याच्या समोरून जायची. एका दिवशी महिलेने लक्ष देऊन पाहिल्यावर तिला दिसले की, तो दररोज काही ना काही रद्दी कागदांवर लिहतो आहे. एका दिवशी महिलेने त्याला विचारले की, तुम्ही काय लिहीत आहात? यानंतर त्या भिकाऱ्याचे आयुष्यच बदलले.  

 

एका कागदाने सगळेच काही व्यक्त केले...
- राइमुंडो ब्राझीलच्या साओ पावलो शहरात अनेक वर्षांपासून भीक मागून गुजराण करत होता. फाटलेले-जुने कपडे आणि अस्ताव्यस्त केसांचा या माणसाकडे कुणीही लक्ष देत नव्हते. एका दिवशी जवळच राहणारी महिला शाला मोंटिएरो यांनी त्याच्याशी संवाद साधला. तेव्हा राइमुंडोने कोणतेही उत्तर दिले नाही. फक्त महिलेला एक रद्दी कागद दिला. महिलेने जेव्हा तो लक्षपूर्वक पाहिला तेव्हा त्यावर एक आकर्षक कविता होती.

 

महिलेने फेसबुकवर सांगितली कहाणी
शाला यांना कळले की, हा भिकारी अनेक वर्षांपासून रस्त्याच्या कडेला बसून कविता लिहितोय. शाला सलग अनेक दिवस त्याला भेटण्यासाठी गेल्या. दरवेळी तो शाला यांना एक नवी कविता लिहून द्यायचा. यामुळे प्रभावित होऊन महिलेने त्याची एक कविता फेसबुकवर शेअर केली. ती लोकांना प्रचंड आवडली. जेव्हा काही लोकांना विश्वास बसला नाही की, एक भिकारी असे लिहू शकतो, तेव्हा शाला यांनी त्याचे एक पेज बनवून त्याचे फोटोजही अपलोड केले.

 

पाहता-पाहता झाले 1 लाख फॉलोअर्स
शाला यांनी राइमुंडो याच्या नावाने एक फेसबुक पेज तयार करून त्याच्या कविता शेअर केल्या, त्या लोकांना प्रचंड आवडल्या. पाहता-पाहताच रायमुंडोचे फॅन वाढत गेले आणि जवळजवळ 1 लाख लोकांनी त्याला पेजला फॉलो करणे सुरू केले. फेसबुकवर Raimundo Arrudo Sobrinho नावाच्या पेजावर आता 2 लाख फॉलोअर्स झालेले आहेत.

 

मेकओव्हरनंतर कळले की, भिकारी नाही व्यापारी होता
राइमुंडो जेव्हा प्रसिद्ध झाला, तेव्हा लोक त्याला भेटण्यासाठी पोहोचले. त्याचे पेज बनवणाऱ्या महिलेने त्याचा मेकओव्हर केला. त्याने अनेक वर्षांपासून अंघोळ केलेली नव्हती. शाला यांनी त्याचे केस कापून घेतले. शेव्हिंग केल्यावर नवे कपडे घेऊन दिले. यानंतर त्याला ओळखणे अवघडच होऊन बसले. तथापि, त्याच्या नव्या अवताराला पाहून फेसबुकवर त्याच्या भावाने त्याला ओळखले. तेव्हा कळले की, राइमुंडो एक व्यापारी होता, जो लष्करी हुकूमशाहीदरम्यान घरापासून दुरावला होता. पैशांच्या अभावामुळे त्याचे असे हाल झाले होते.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...  

 

 

बातम्या आणखी आहेत...