आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण विमान अपघात..भुकेने तडफडत होते बचावलेले लोक, तेव्हा आपल्याच साथिदारांचे खाल्ले मांस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उरुग्वे - इंडोनेशियातील जकार्ताहून पंगकल पिनांगकडेे जाणारे लायन एअरलाइन्सचे विमान सोमवारी जावा समुद्रात कोसळून 188 जणांचा मृत्यू झाला. विमानात 3 मुलांसह 181 प्रवासी, 2 वैमानिक व 5 केबीन क्रू सदस्य हाेते. ही घटना जकार्ताहून 52 किमीवरील केरवांग येथे घडली. तेथे समुद्र फक्त 30 मीटर खोल आहे. दिल्लीचे वैमानिक भव्य सुनेजा (31) ते उडवत होते. हा इंडोनेशियातील सर्वात मोठा विमान अपघात आहे.

 

इतिहासात असे अनेक अपघात झाले आहेत. हे अपघात कसे झाले, हे अद्याप समोर येऊ  शकले नाही. बहुतांश अपघातांमध्ये काही लोक थोडक्यात बचावले. त्यांना जिवंत राहाण्यासाठी अत्यंत प्रतिकृत परिस्थितीचा सामना करावा लागला.

 

अशीच एक घटना 1972 मध्ये अँडीसच्या बर्फाच्छादित डोंगराळ भागात घडली होती, ज्यामध्ये जीवंत वाचलेल्या लोकांना 72 दिवसांपर्यंत अन्नपाण्याशिवाय राहावे लागले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या सहप्रवाशांना डोळ्यासमोर मरताना पाहिले होते. एवढेच नाही तर त्यांनी जीवंत राहण्यासाठी, मेलेल्या सहप्रवाशांचे मांस खाल्ले होते. 

 

इतिहासातील हा अपघात 1972 अँडीस फ्लाइट आपत्ती किंवा मिरॅकल ऑफ अँडी़स म्हणून ओळखला जातो. ही दुर्घटना ओल्ड ख्रिश्चन क्लब ऑफ उरुग्वेच्या रग्बी संघाच्या दोन खेळाडूंच्या जिद्दीसाठी देखील ओळखला जाते, ज्यांनी शेवटपर्यंत हार न मानता आपल्यासोबत अनेक लोकांचे प्राण वाचवले.

 

वायुसेनाच्या विमानात होता रग्बी संघ

> हा दुःखद अपघात 13 ऑक्टोबर 1972 रोजी झाला होता.  उरुग्वेच्या ओल्ड ख्रिश्चन क्लबचा रग्बी संघ त्यात शिकार ठरला होता. हा संघ चिलीच्या सॅंटियागोमध्ये खेळण्यासाठी जात होता. उरुग्वे वायुसेनेच्या विमानात संघाचे खेळाडू, त्यांचे व्यवस्थापक आणि त्यांचे कुटुंब आणि मित्रांसह अँडी़सवरून जात होते.

> विमानात एकूण 45 लोक होते. उड्डान घेतल्यानंतर काही वेळेतच हवामान बिघडल्याने पायलटला अँडीसच्या पांढर्‍या बर्फाच्छादित पर्वतांमध्ये काहीच दिसत नव्हते. पायलटला धोका जाणवू लागला होता.

 

एका झटक्यात विमानाचे तुकडे
> 14 हजार फूट उंचीवर पायलटला काही समजण्याआधीच विमान अँडीस पर्वतांच्या शिखरावर कोसळले. वेगवान विमान कोसळल्यामुळे जोरदार धमाका झाला.

> या भयंकर दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला. उर्वरित 27 देखील प्रतिकूल परिस्थितीत जीवंत राहिले, पण अँडीसच्या रक्त गोठवणाऱ्या बर्फांमधील आयुष्य त्यांच्यासाठी मृत्यूपेक्षाही वाईट असल्याचे सिद्ध होत होते.

 

शोध मोहिम सुरू झाली परंतु काहीही आढळले नाही

> अपघाताची माहीती कळल्यानंतर लगेच उरुग्वे सरकारने सक्रियता दर्शविली आणि बचाव अभियान सुरू केले, परंतु विमानाचा रंग पांढरा असल्याने अँडीस पर्वतांच्या पांढऱ्या बर्फामध्ये शोधणे म्हणजे गवतच्या ढिगाऱ्यात सुई शोधण्यासारखे होते. 10 दिवसांच्या अथक प्रयत्नांनतर

11व्या दिवशी बचाव कार्य बंद करण्यात आले.

> सर्वांना असे वाटत होते, की अँडीसच्या खराब हवामानात अन्न-पाण्याशिवाय कोणीही एवढ्या दिवस जिवंत राहणे अशक्य आहे.


बचावलेल्या लोकांमध्ये भुकमारीपासून वाचण्याचे युद्ध 

> वाचलेल्या 27 लोकांमध्ये, काही जखमी झालेले लोक मरण पावले. बाकीच्या लोकांनी स्वत:जवळ असलेल्या अन्नाचे छोट्या छोट्या भागांत विभाजण केले. पाण्याची कमतरता कमी करण्यासाठी त्यांनी विमानातून धातूचा एक तुकडा घेतला जो सूर्यप्रकाशात लवकर गरम होऊ शकेल. त्यानंतर त्यांनी त्यावर बर्फ टाकून ते वितळवून पाणी जमा कले. त्यामुळे त्यांच्या पाण्याच्या समस्येचे निराकरण झाले परंतु काही दिवसांनी त्यांच्याकडे असलेले जेवण संपले.

 

भुक भागवण्यासाठी खाल्ले मानवी मांस 

> जेवण संपल्यानंतर, वाचलेले लोक भुकेमुळे इतके व्यथित झाले की त्यांनी मेलेल्या सहप्रवाशांच्या मृतदेहाचे मांस खायला सुरुवात केली.


खेळाडूंनी वाचवले प्राण
> त्यानंतर फक्त 16 लोक जिवंत राहिले होते. अपघात होवून 60 दिवस झाले होते तरी मदतीची काहीही आशा नव्हती. या लोकांमध्ये दोन फुटबॉल खेळाडू होते. नॅन्डो पॅरेडो आणि रॉबर्ट केनेसा यांना वाटले असेच मरण्यापेक्षा मदत मिळण्याकरिता काहीतरी हालचाल करावी. या 60 दिवसांच्या काळात शरिर पुर्ण थकून गेले होते, बर्फावर ट्रॅक करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी साधने  नव्हती.  पण ते दोघेही खेळाडू होते आणि शेवटपर्यंत दोन्हीही खेळा़डू हार मानन्यास तयार नव्हते. काही दिवस प्रयत्न केल्यानंतर ते दोघे चिलीच्या लोकसंख्येच्या परिसरात पोहचले, त्याठिकाणी त्यांनी अपघात झालेल्या ठिकाणाची जागा सागून मदककार्य पोहचवण्यास मदत केली. 

>  अपघाताच्या 72 दिवसांनंतर 16 जण जिवंत राहणे हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसल्याचे मानले जात होते. पॅरेडो यांनी संपूर्ण घटनेवर एक पुस्तक काढले आहे. त्यात त्यांच्या संघर्षाची गोष्ट दिली आहे. 1974 मध्ये पिअर्स पॉल रीड यांनी 'अॅलाइव्ह' हे पुस्तक लिहिले, त्याचे दिग्दर्शक फ्रॅंक मार्शल यांनी 1993 मध्ये चित्रपट तयार केला होता.

 

बातम्या आणखी आहेत...