आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंदूर- टीम इंडियाच्या आॅफ स्पिनर आर. अश्विनने (२/४३) आपल्या घरच्या मैदानावर आयाेजित बांगलादेश संघाविरुद्ध सलामीच्या कसाेटी सामन्यात चमकदार कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात दाेन बळी घेतले. यासह त्याच्या नावे घरच्या मैदानावर सर्वात कमी सामन्यांत २५१ बळी पूर्ण करण्याच्या विक्रमाची नाेंद झाली. त्याने ४२ कसाेटींत हा पल्ला गाठला. अशी कामगिरी करणारा ताे पहिला गाेलंदाज ठरला. त्याने बांगलादेशविरुद्ध पहिल्याच कसाेटीच्या पहिल्या डावात या विक्रमाला गवसणी घातली. श्रीलंकेच्या मुरलीधरनच्या नावे ४२ सामन्यांत या विक्रमाची नाेंद हाेती.
सलामीच्या कसाेटीत बांगलादेश संघाची पहिल्याच डावात दाणादाण उडाली. त्यामुळे बांगलादेश टीमला अवघ्या १५० धावांवर आपला पहिला डाव गुंडाळावा लागला. भारताच्या वेगवान गाेलंदाज शमीने तीन बळी घेतले. तसेच ईशांत शर्मा, अश्विन आणि उमेश यादवने प्रत्येकी दाेन विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात १ बाद ८६ धावा काढल्या. आता भारताचा चेतेश्वर पुजारा (४३) आणि सलामीवीर मयंक अग्रवाल (३७) मैदानावर कायम आहेत. या दाेघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी रचली आहे. ६४ धावांनी पिछाडीवर असलेल्या भारताकडे ९ विकेट शिल्लक आहेत.
शमी आणि ईशांतकडून टीम इंडियाची हॅट॰ट्रिक
बांगलादेशच्या डावातील ५४ व्या षटकातील शेवटच्या दाेन चेंडूंवर शमीने रहीम आणि मेहदीला बाद केले. त्यानंतर ५५ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ईशांतने लिटन दासची विकेट काढली. अशा प्रकारे टीम इंडियाने सलग तीन चेंडूंवर बळीची हॅट॰ट्रिक साजरी केली. मात्र, शमीला हॅट॰ट्रिक साजरी करता आली नाही.
भारताचे सुमार क्षेत्ररक्षण; चार झेल साेडले
> 16.3 षटक : आर. अश्विनच्या चेंडूवर रहाणेने माेमिनुलचा झेल साेडला.
> 23.1 षटक: उमेशचा चेंडू, तिसऱ्या स्लिपमध्ये काेहलीने रहीमचा.
> 23.3 षटक: झायेद यांच्या चेंडूवर कायेसने मयंकचा (३२) झेल साेडला.
> 27.1 षटक : अश्विनच्या चेंडूवर रहाणेने रहीमचा झेल साेडला.
> 43.3 षटक: अश्विन याच्या चेंडूवर रहाणेकडून महमुदुल्लाहला जीवदान.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.