आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Ind Vs NZ Match Due To Rain; Remaining Match Starts Today, However, The Probability Of Rain In Manchester Is Still Up To 50%

पुन्हा पावसाचा खोडा... आज आपली बॅटिंग; मात्र, आजही मँचेस्टरमध्ये पावसाची शक्यता ५०% पर्यंत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मँचेस्टर - वर्ल्डकपची पहिली सेमी फायनल मंगळवारी पावसामुळे अर्ध्यावर थांबली. न्यूझीलंड संघ ४६.१ षटकांत ५ बाद २११ धावांवर असताना पावसाने खोडा घातला. उर्वरित सामना बुधवारी खेळवण्याचा निर्णय रात्री ११ वाजता झाला. मात्र, हवामान खात्याने बुधवारीही ५०% पावसाची शक्यता वर्तवली आहे. पाऊस थांबला नाही तर न्यूझीलंड वर्ल्डकप बाहेर होईल अन् गुणांच्या आधारे भारत अंतिम फेरीत दाखल होईल.

 

गोलंदाजीपुढे नांगी, पाॅवर प्लेत न्यूझीलंडच्या सर्वात कमी धावा
न्यूझीलंडने १० षटकांत २७ धावा केल्या. या यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पाॅवर प्लेमधील सर्वात कमी धावा आहेत. किवीजला १०० धावांसाठी २८.१ षटके लागली. पहिली धाव घेण्यासाठी १७ चेंडूंची वाट पाहिली.

 

सामना पूर्ण झाला नाहीच तर यापैकी एक लक्ष्य मिळेल...

46 षटके  :    237 धावा
40 षटके  :   223 धावा
35 षटके  :    209 धावा
30 षटके  :    192 धावा
25 षटके  :   172 धावा
20 षटके  :  148 धावा