आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
माउंट मानगुनाई - काेहलीच्या कुशल नेतृत्वाखाली भारतीय संघाने यंदाच्या सत्रातील पहिल्याच विदेश दाैऱ्यात विराट विजयाची नाेंद केली. टीम इंडियाने न्यूझीलंडच्या दाैऱ्यात निर्विवादपणे आपले वर्चस्व कायम ठेवताना पाच टी-२० सामन्यांची मालिका ५-० ने जिंकली. अशा प्रकारे या फाॅरमॅटची ५+ सामन्यांची मालिका ५-० ने जिंकणारा भारत हा जगातील पहिलाच संघ ठरला. भारताने रविवारी मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. भारताने ७ धावांनी सामना जिंकला. यासह ही मालिका ५-० ने आपल्या नावे केली. याच विजयाच्या बळावर भारतीय संघाने टी-२०च्या विश्वचषकासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले.
भारताने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसमाेर विजयासाठी १६४ धावांचे खडतर लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात न्यूझीलंडला ९ गडी गमावून १५६ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह टीमला सलग पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला.
१४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग आठ टी-२० सामने जिंकले
भारतीय संघाने आपला पहिला टी-२० सामना २००६ मध्ये खेळला हाेता. संघाने आतापर्यंत १३४ सामने खेळले. भारताच्या नावे या फाॅरमॅटच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग आठ टी-२० सामने जिंकण्याचा पराक्रम झाला आहे. यासह भारताने सलग सर्वाधिक विजयांमध्ये दुसऱ्या स्थानावर धडक मारली.
न्यूझीलंड : ६५ वा पराभव नाेंद
घरच्या मैदानावरील सुमार खेळीमुळे यजमान न्यूझीलंडच्या टीमला आपली पराभवाची मालिका खंडित करता आली नाही. न्यूझीलंडच्या नावे या फाॅरमॅटमध्ये सर्वाधिक ६५ पराभवाचा जागतिक विक्रम नाेंद झाला आहे.
भारताचा विक्रमाला उजाळा :
भारतीय संघाने ३७ वर्षांपूर्वीच्या विक्रमाला उजाळा दिला आहे. भारताने १९८३ च्या विश्वचषकातील फायनलमध्ये विंडीजचा पराभव केला हाेता. त्यानंतर विंडीजने भारताला वनडे मालिकेत ५-० ने पराभूत केलेे. २०१९ मध्ये भारताला वनडे विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने पराभूत केले. आता याच पराभवाचा वचपा काढताना भारताने यजमान न्यूझीलंडचा घरच्या मैदानावर ५-० ने सुफडा साफ केला.
चाैकार-षटकारांचा पाऊस तरीही यजमान पराभूत
न्यूझीलंडने ६४ चाैकार आणि ३९ षटकारांचा समावेश आहे. तरीही एकही सामना जिंकला नाही. भारताने ५५ चाैकार आणि ३५ षटकर ठाेकले.
शिवम दुबे ठरला दुसरा सर्वात महागडा गाेलंदाज :
भारताच्या युवा गाेलंदाज शिवम दुबेने डावाच्या १० व्या षटकांत ३४ धावा दिल्या. यासह ताे टी-२० मध्ये दुसरा सर्वात महागडा गाेलंदाज ठरला. २००७ च्या विश्वचषकात युवीचे ब्राॅडच्या एका षटकात सलग सहा षटकार ठाेकले हाेते.
राहुल मालिकेत सर्वाधिक धावा काढणारा एकमेव :
पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक २२४ धावा एकट्या लाेकेश राहुलने केल्या. यामध्ये दाेन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या नावे आता पाच वा त्यापेक्षा कमी सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम नाेंद.
राेहितला दुखापत; वनडे मालिकेपूर्वी हाेणार फिट
राेहित शर्माला फलंदाजी करताना गंभीर दुखापत झाली. मात्र, आता ताे बुधवारपासून सुरू हाेणाऱ्या वनडे मालिकेपूर्वी फिट हाेणार असल्याची माहिती संघाच्या वतीने देण्यात आली. त्याने आता पाचव्या सामन्यात ६० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. येत्या बुधवारपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.