आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालिका पराभव काेहलीच्या जिव्हारी; पत्रकारावर भडकला

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • न्यूझीलंडचा भारतावर मालिका विजय; सात गड्यांनी केली मात
  • आठ वर्षांनंतर मालिकेसह सर्वच सामने गमावले

ख्राइस्टचर्च - सलगच्या विजयाने फाॅर्मात असलेल्या न्यूझीलंड संघाने सलग दुसऱ्या कसाेटीत भारतावर मात केली. न्यूझीलंडने  साेमवारी चाैथ्यांच दिवशी भारतावर मालिका विजयाची नाेंद केली. न्यूझीलंडने सात गड्यांनी दुसरी कसाेटी जिंकली. यासह न्यूझीलंड संघाने भारताविरुद्ध  दाेन कसाेटी सामन्यांची मालिका २-० ने आपल्या खिश्यात घातली. मात्र, हाच मालिका पराभव टीम इंडियाच्या कर्णधार विराट काेहलीच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यामुळेच सामन्यानंतरच्या आयाेजित पत्रकार परिषदेत काेहलीच्या रागाचा पारा चढला. यादरम्यानच्या आक्रमकतेबाबत एका पत्रकाराने काेेहलीला प्रश्न विचारला. विलियम्सनला बाद केल्यानंतरच्या इशाऱ्याबाबतचा हा काेहलीला प्रश्न हाेता. यावरून संतप्त झालेल्या काेहलीने पत्रकारासाेबत वाद घातला. काेहलीने पत्रकारावरच प्रश्नांचा भडिमार केला. मैदानावरच्या घटनेबाबत तुम्ही अर्धवट माहिती घेऊन याठिकाणी आला आहात. मी पंचासाेबत चर्चा केली.आठ वर्षांनंतर मालिकेसह सर्वच सामने गमावले 


भारताने साेमवारी ६ बाद ९० धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. दुसऱ्या डावात भारताच्या संघाने १२४ धावांवर आपला गाशा गुंडाळला. न्यूझीलंडला यातून १३२ धावांचे लक्ष्य मिळाले. न्यूझीलंडने  लक्ष्य ३ गड्यांच्या माेबदल्यात सहज गाठले. भारताने आठ वर्षांनंतर मालिकेसह सर्वच सामने गमावले आहेत. 

न्यूझीलंडवर काैतुकाचा वर्षाव करणारा काेहली आता म्हणाला, ‘भारत दाैऱ्यावर आल्यावर दाखवून देणार’  

विराट काेहलीने दाैऱ्यावर आल्यानंतर  न्यूझीलंडवर काैतुकाचा वर्षाव केला हाेता. वचपा काढण्याच्या  प्रश्नावरही त्याने आपण असा विचार  केला नाही, अशा साैम्य शब्दांत उत्तर दिले हाेते. मात्र, आता ख्राइस्टचर्चवरील पराभवानंतरची काेहलीची प्रतिक्रिया पूर्णत: वेगळी आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार काेहलीने मैदानावर पराभवानंतर आता या संघाला भारत दाैऱ्यावर इंगा दाखवणार असल्याचे वक्तव्य केले.