आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‌भारताचे घरच्या मैदानावर दाेन वर्षांत नऊ कसाेटी सामने; वर्चस्व कायम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशाखापट्टणम - यजमान टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसाेटी सामन्यांच्या मालिकेला आज बुधवारपासून सुरुवात हाेत आहे. घरच्या मैदानावर भारतीय संघाचे कसाेटीच्या फाॅरमॅटमध्ये  सातत्याने वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे आता हेच निर्विवाद वर्चस्व सिद्ध करण्याच्या इराद्याने टीम इंडिया घरच्या मैदानावर उतरणार आहे. िवशाखापट्टणम येथील वायएसआर स्टेडियमवर आतापर्यंत एकच कसाेटी सामना खेळवण्यात आला. या कसाेटी सामन्यात भारताने पाहुण्या इंग्लंडला माेठ्या फरकाने पराभूत केले हाेते. भारताने या मैदानावर २४६ धावांनी विजयाचे खाते उघडले आहे. त्यामुळे आता हाच विजयाचा कित्ता पुन्हा या मैदानावर गिरवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.  पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघासाठी हा दाैरा महत्त्वाचा  मानला जात आहे. कारण, गत नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या भारत दाैऱ्यातील पराभवाची मालिका खंडित करण्याची आफ्रिकेला संधी आहे. आफ्रिकेच्या संघानेे गत नऊ वर्षांमध्ये भारतात एक विजय मिळवला नाही. 
 

सलामीवीराच्या भूमिकेत राेहितला अनेक संधी : काेहली
कसाेटीत सलामीवीराच्या भूमिकेसाठी राेहित शर्माला आता भारतीय संघाचा कर्णधार विराट काेहलीचेही पाठबळ मिळाले. राेहितच्या उपस्थितीत टीमची आघाडीची फळी ही अधिकच मजबूत हाेईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. ‘राेहितला सलामीवीराच्या भूमिकेत अव्वल कामगिरी करण्यासाठी  संधी दिल्या जाणार आहेत. यामध्ये त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची माेठी संधी आहे, असेही काेहली म्हणाला.
 

ऋषभच्या ११ डावांत २०६ धावा, त्यामुळे विश्रांती
या कसाेटीसाठी यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आली. त्याच्या जागी संघात वृद्धिमाना साहाची निवड झाली. ऋषभने कसाेटीच्या शेवटच्या तीन डावांत २४, ७ आणि २७ धावांची, वनडेतील शेवटच्या चार डावांत ४, ३२, २० ,२० आणि टी-२०च्या शेवटच्या चार डावांत ४, ६५, ४, १९ धावांची खेळी केली.
 

तीन माेठे फॅक्टर, जे सामन्याला कलाटणी देतील  

स्पिनर:  आफ्रिकेच्या ७४  टक्के विकेट घेतात 
आफ्रिकेने आतापर्यंत  भारतात १६ कसाेटी सामने खेळले आहेत. यात आफ्रिकेने आपल्या २४३  विकेट गमावल्या. यातील १७९ म्हणजेच ७४ टक्के बळी हे फिरकीपटूंनी घेतले आहेत. तसेच वेगवान गाेलंदाजांना ६४ विकेट मिळाल्या.  विशाखापट्टणम येथील खेळपट्टी ही फिरकीपटूंसाठी पाेषक आहे. येथे आतापर्यंत एकच कसाेटी झाली. यात ३९ पैकी २५  विकेट फिरकीपटूंनी घेतल्या हाेत्या. 
 

वेगवान गाेलंदाज :  आफ्रिकेचे ७६%बळी घेता
गत चार वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास भारताच्या वेगवान गाेलंदाजांनी ८६० पैकी ४०२ विकेट घेतल्या आहेत. म्हणजेच ४७ टक्के आहेत. दुसरीकडे आफ्रिकेचे वेगवान गाेलंदाज अधिक सरस ठरले आहेत. त्यांनी आतापर्यंत ७१४ पैकी ५४४ बळी  घेतले. म्हणजेच याचे प्रमाण ७६ टक्के नाेंद झाले. सध्या वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराह बाहेर असल्याने भारतीय संघाला माेठा धक्का बसला.
 

फलंदाज:  सलामीवीर ते मधली फळीपर्यंत सर
गत चार वर्षात भारताच्या सलामीवीरांनी कसाेटीमध्ये ४० च्या सरासरीने आणि आफ्रिकेच्या सलामीवीरांनी ३६ च्या सरासरीने  धावांची कमाई केली. तसेच मधल्या फळीतल्या (४ ते ७ पर्यंत) फलंदाजांची भारताकडून सरासरी ४३ नाेंद झाली. आफ्रिकेची ३३ सरासरी आहे. म्हणजेच भारतीय संघ  हा सलामावीरापासून मधल्या फळीपर्यंत आफ्रिकेपेक्षा अधिक सरस आहे.