क्रिकेट / भारताचा वेस्टइंडीजवर 318 धावांनी विजय; इशांत आणि बुमराहच्या गोलंदाजीपुढे विंडीजचा संघ ढासाळला

रहाणे ठरला सामनावीर; 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने घेतला आघाडी
 

Sep 17,2019 02:00:31 PM IST

एंटीगुआ - येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्टइंडीजचा 318 धावांनी पराभव केला. भारताने परदेशात मोठ्या धावांच्या फरकाने विजय मिळवला आहे. यासोबत भारताने दोन कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे. इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे आणि जसप्रीत बुमराह यांच्या कामगिरी भारताने विंडीज वर विजय मिळवला. रहाणेचे दोन्ही डावांत 102 आणि 81 असा उच्च स्कोर राहिला. तर इशांत शर्माने एकूण 8 गडी बाद केले. जसप्रीत बुमराह चौथ्या डावाचा हिरो ठरला. त्याने 7 धावा देत 5 गडी बाद केले आणि संघाला चौथ्याच दिवशी विजय मिळवून दिला. 5 गडी बाद करण्याची बुमराहची ही चौथी वेळ होती.


रहाणे ठरला सामनावीर
भारताने पहिल्या डावात 297 धावा केल्या होत्या वेस्टइंडीजचा संघ 222 धावांवर सर्वबाद झाला. यामुळे भारताला विंडीजवर 75 धावांची आघाडी मिळाली होती. दुसऱ्या डावात भारताने 7 गडींच्या मोबदल्यात 343 धावा करत विंडीजला 319 धावांचे लक्ष्य दिले. रहाणेने पहिल्या डावात कोहली तर दुसऱ्या डावात हनुमा विहारीसोबत शतकी भागीदारी केली. रहाणे सामनावीराचा मानकरी ठरला. कोहलीने 51 तर विहारीने 93 धावा केल्या.

X