आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फासावर चढण्याआधी शहिदांनी बहिणीला लिहिले... मी अमर होणार आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यलढ्यातही क्रांतिकारकांना आपल्या बहिणींची काळजी होती. खरे तर देशासाठी शहीद होण्याचा दिवसही ठरला होता, तरी ते बहिणीला धीर देत होते. भाऊ-बहिणीचे भावनिक नाते सांगणारी ही दोन पत्रे...


अशफाक उल्ला : फाशीपूर्व तीन दिवस मित्र सचिंद्रनाथ बक्षीच्या बहिणीला पत्र लिहून कळवले, ‘मी हीरोसारखा जग सोडत आहे’
माय डिअर दीदी, फैजाबाद जेल, १६ डिसेंबर १
९२७
मी नव्या दुनियेत जात आहे... तिथे संसारी जीवनातील क्लेश नाहीत आणि चांगले जीवन जगण्यासाठी संघर्षही करावा लागणार नाही. मी मरणार नाही, उलट कायम जगणार आहे. सोमवार अंतिम दिवस आहे. माझा शेवटचा बंदे (चरणस्पर्श) स्वीकार कर... मला िनरोप दे. माझा मृत्यू कसा झाला ते तुम्हाला नंतर कळेल. तुमच्यावर कायम देवाची कृपा राहो. तुम्हा सर्वांना एकदा पाहण्याची इच्छा आहे. शक्य झाले तर भेटायला या. बक्षीला माझ्याबद्दल सांग. मी तुला माझी बहीण मानतो आणि तुही मला विसरणार नाहीस. आनंदी राहा... मी हीरोसारखा जग सोडून जातोय. - तुझा अशफाक 


भगतसिंग : फाशीपूर्वी सहा महिने मित्र बटुकेश्वर दत्त यांच्या बहिणीला पत्र लिहिले होते,  ‘धीर धर, सर्व काही चांगले घडेल..’
प्रिय दीदी,सेंट्रल जेल, लाहोर, १७ जुलै
१९३०
काल रात्री बट्टूला (बटुकेश्वर दत्त) दुसऱ्या कोणत्या तरी तुरुंगात हलवण्यात आले आहे. त्याला नेमके कुठे नेले ते अजून माहिती झालेले नाही. या परिस्थितीत माझी तुला कळकळीची विनंती आहे की, कोणत्याही परिस्थितीत तू वाराणसी सोडून लाहोरला जाऊ नकोस. बट्टूपासून विभक्त होणे खरे तर मलाही खूप कठीण वाटत आहे. भावांपेक्षाही तो मला अधिक प्रिय आहे. तू धैर्य, हिंमत बाळग. चिंतेचे काही कारण नाही. येथून बाहेर पडल्यावर सर्व काही चांगले घडेल. - तुझा भगतसिंग

टागोर यांनी वंगभंग रोखण्यासाठी राखीने जोडला हिंदू-मुस्लिम एकतेचा धागा
१९०५ मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली. पूर्व बंगाल मुस्लिमांसाठी आणि प. बंगाल हिंदूंसाठी. याविरुद्ध रवींद्रनाथ टागोर यांनी राखी महोत्सव सुरू केला. तेव्हा रक्षाबंधन केवळ भाऊ-बहिणीचा सण राहिला नव्हता, तर हिंदू-मुस्लिम परस्परांना राखी बांधत होते. याच्या परिणामी १९११ मध्ये इंग्रजांना बंगालचे विलीनीकरण करावे लागले. शांतिनिकेतनमध्ये आजही राखीपौर्णिमा अशीच साजरी केली जाते.