आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Independence Day Prime Minister Narendra Modi Hosts Tricolour And Speech At Red Fort

स्वातंत्र्यदिन : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करून आम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वप्न पूर्ण केले- मोदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी मोदी म्हणाले, स्वातंत्र्यानंतरही या देशासाठी ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांना नमन. आज राखीपौर्णिमा आहे. हा पवित्र सण सर्व बहीण-भावंडांसाठी आनंदाने भरलेला राहावा.

मोदी म्हणाले, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करून आम्ही सरदार वल्लभभाई पटेलांचं स्वप्न पूर्ण केले. आम्ही पूर्ण समर्पणाने तुमच्या सेवेसाठी समर्पित आहोत. कलम ३७० रद्द करणे, तीन तलाकविरुद्ध कायदा बनवणे आणि दहशतवादाविरुद्धची लढाई मजबूत करण्यासारखे निर्णय घेतले, शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरु केली. देशामध्ये जल संरक्षणाची आवश्यकता आहे. यासाठी जलशक्ती मंत्रालय बनवले. 2019 नंतरच काळ देशाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आहे.

फक्त 70 दिवसांमध्ये करून दाखवले
70 वर्षांमध्ये जे झाले नाही ते काम या सरकारने 70 दिवसांमध्ये करून दाखवले. केंद्र सरकारने कलम 370 रद्द करण्यासाठी पुढाकार घेतला आणि रद्द केले. जनतेने दिलेले काम करण्यासाठी आज सत्तेमध्ये आलो आहोत.

बातम्या आणखी आहेत...