Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | Independent Vidarbha's disillusionment, only 13,910 votes got 7 Vidarbha candidates

स्वतंत्र विदर्भाचा अपेक्षाभंग, ७ विदर्भवादी उमेदवारांना मिळाली फक्त १३,९१० मते

प्रतिनिधी | Update - May 28, 2019, 09:05 AM IST

दिग्गजांनी प्रचार करूनही सर्व उमेदवारांचे डिपॉझिट झाले जप्त

  • Independent Vidarbha's disillusionment, only 13,910 votes got 7 Vidarbha candidates

    नागपूर - स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीच्या मुद्द्यावर एकत्र येत १२ विदर्भवादी संघटनांनी स्थापन केलेल्या विदर्भ निर्माण महासंघाच्या सातही उमेदवारांचा लोकसभा नविडणुकीत दारुण पराभव झाल्याने विदर्भ निर्मितीची आशा करपल्याची चर्चा सुरू झाली आहे. विदर्भवादी ७ उमेदवारांना एकत्रितपणे केवळ १३ हजार ९१० मते पडली असून ती एकूण मतदानाच्या एक टक्काही नाहीत. त्यामुळे वेगळ्या विदर्भाच्या मागणीला मतदारांनी नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

    यापूर्वी माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांनी विदर्भ राज्य पार्टी स्थापन करून लोकसभा नविडणूक लढवली होती. त्या वेळी पुरोहित यांना सुमारे २८,५०० मते मिळाली होती. तेव्हाही त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यानंतर माजी दविंगत आमदार जांबुवंतराव धोटे यांच्यानंतर विदर्भवादी उमेदवाराला मिळालेली ही सर्वाधिक मते होती. या निर्माण महामंचातर्फे नागपुरातून सुरेश माने, भंडारा-गोंदियातून देवीदास लांजेवार, चंद्रपूर दशरथ मडावी, वर्धा प्रा. ज्ञानेश वाकुडकर, रामटेक चंद्रभान रामटेके, अमरावती नरेंद्र कठाणे व अकोला येथून गजानन हरणे यांनी नविडणूक लढवली होती. अॅड. वामनराव चटप, अॅड. श्रीहरी अणे, राम नेवले आदींनी त्यांचा प्रचार केला. मात्र, नविडणुकीत या उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त झाले. या सर्व उमेदवारांना एकत्रितपणे १३ हजार ९१० मते मिळाली. काही वर्षांपूर्वी जनमंच या स्वयंसेवी संघटनेने घेतलेल्या जनमत चाचणीत लोकांनी केलेल्या मतदानाच्या एक टक्काही मते विदर्भवादी उमेदवारांना मिळालेली नाहीत. त्यामुळे मतदारांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्याला नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.

    १२ संघटनांची मोट अपयशी
    १२ विदर्भवादी उमेदवारांची मोट बांधून स्थापन करण्यात आलेल्या महामंचालाही अपयश आले. यात विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी, आम आदमी पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टी, आरपीआय खोब्रागडे, लोकजागर पार्टी, शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष, नॅशनल फेडरेशन ऑफ न्यू टेस्ट आदी संघटनांचा समावेश आहे.

Trending