आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-अफगाणिस्तान यांच्यातील अटीतटीचा सामना झाला टाय; २०१६ नंतर धोनी वनडेत कर्णधार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून अाेळखल्या जाणाऱ्या महेंद्रसिंग धाेनीने अाता वयाच्या ३७ व्या वर्षी एका विक्रमाला गवसणी घातली. त्याने अाशिया चषकामध्ये मंगळवारी अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले. यातून ताे भारताचा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला. याशिवाय त्याने नेतृत्वाचा २०० वा वनडे सामना खेळला. यासह त्याने वनडेमध्ये नेतृत्वाचे द्विशतक साजरे केले.

 

अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यामध्ये राेहित शर्मासह शिखर धवनला विश्रांती देण्यात अाली. त्यामुळे धाेनीकडे कर्णधारपदाची धुरा साेपवण्यात अाली. यातून त्याने नेतृत्वाचा २०० वा वनडे सामना खेळला. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या संघाने ८ बाद २५२ धावा काढल्या. प्रत्यु्त्तरात भारतानेही २५२ धावा काढल्या. यासह हा अटीतटीचा सामना टाय झाला. भारताकडून लाेकेश राहुल (६०) अाणि रायडूचे (५७) झुंज व्यर्थ ठरली. 


अफगाणच्या सलामीवीर शहजाद (१२४) अाणि जावेद अहमदी (५) यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. यातून त्यांनी संघाला अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली. नबीने ५६ चेंडूंमध्ये ६४ धावांची खेळी केली. 

 

अझरुद्दीनवर मात 
कर्णधाराच्या भूमिकेमध्ये धाेनीने अाता अझरुद्दीनलाही मागे टाकले. धाेनीने ३७ वर्षे ८० व्या दिवशी वनडेमध्ये नेतृत्व करण्याचा पराक्रम गाजवला. यासह ताे भारताचा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला. अझरुद्दीनच्या नावे ३६ वर्षे १२४ दिवसांची नाेंद अाहे. 


शहजादचे शतक;११६ चेंडूंमध्ये १२५ धावा 
अापली झंझावाती लय कायम ठेवताना शहजादने शानदार शतक झळकावले. त्याने ११६ चेंडूंत १२४ धावा काढल्या. यामध्ये ११ चाैकारांसह ७ षटकारांचा समावेश अाहे. यासह त्याने टीमच्या धावसंख्येला गती दिली. 


२०१६ नंतर कर्णधाराच्या भूमिकेमध्ये 
धाेनीने अाता २०१६ नंतर म्हणजेच ६९६ दिवसांनंतर वनडेत कर्णधाराच्या भूमिकेमध्ये मैदानावर पाऊल ठेवले. त्याने अापल्या नेतृत्वात शेवटचा वनडे सामना अाॅक्टाेबर २०१६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला हाेता. त्यानंतर अाता ताे अाज २५ सप्टेंबर २०१८ राेजी कर्णधार म्हणून मैदानावर उतरला. 

 

- ६९६ दिवसांनंतर कर्णधारपदी 
- २०० व्या वनडेमध्ये नेतृत्व करण्याची संधी 
- २०१६ नंतर स्वीकारली नेतृत्वाची धुरा 

 

डबल सेंच्युरी करणारा धाेनी ठरला तिसरा कर्णधार 
धाेनीने नेतृत्वाचा २०० वा वनडे सामना खेळला. यासह त्याने या नेतृत्वात डबल सेंच्युरी साजरी केली. असा पराक्रम गाजवणारा ताे जगातील तिसरा कर्णधार ठरला. यापूर्वी अाॅस्ट्रेलियाच्या पाँटिंग (२३० वनडे) व न्यूझीलंडच्या स्टीफन फ्लेमिंगने (२१८) हा पराक्रम गाजवला. 

बातम्या आणखी आहेत...