आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Africa Match Today: India's Winning Record In Mohali 100%; South Africa For The First Time Ever

भारत- आफ्रिका आज सामना: भारताचे मोहालीत विजयी रेकॉर्ड १०० %; दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच या मैदानावर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय संघाचे प्रशिक्षक शास्त्री यांच्याकडून  टिप्स घेताना शिखर धवन. सध्या धवन फाॅर्मात येण्यासाठी प्रयत्नशील. - Divya Marathi
भारतीय संघाचे प्रशिक्षक शास्त्री यांच्याकडून टिप्स घेताना शिखर धवन. सध्या धवन फाॅर्मात येण्यासाठी प्रयत्नशील.

मोहाली - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-२० सामना बुधवारी मोहाली येथे खेळवला जाईल. धर्मशाळा येथे झालेला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आहे. दुसऱ्या सामन्यात पावसाची शक्यता नाही. अशात टीम इंडिया या मैदानावर आपले १०० टक्के विजयी रेकॉर्ड कायम राखू इच्छिते. टीमने येथे आतापर्यंत दोन टी-२० सामने खेळले आणि दोन्ही जिंकले. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका या मैदानावर पहिल्यांदाच टी-२० सामना खेळणार आहे. भारताने २००९ मध्ये श्रीलंका विरुद्ध २११ धावा काढत या मैदानावर विजय मिळवला आहे.
 

मैदानावर प्रत्येक डावात १८१ धावा
मोहालीमध्ये आतापर्यंत ४ आंतरराष्ट्रीय सामने झाले. आपण प्रत्येक डावात सरासरी १८१ धावा बनवल्या. अशात पुन्हा एकदा मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. दोन वेळा प्रथम फलंदाजी करणारी टीम जिंकली, दोन वेळा पाठलाग करणारी टीम जिंकली. 
 

पंतसह युवा खेळाडूंवर  कामगिरीचा दबा
ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक होणार आहे. अशात यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतसह फिरकीपटू राहुल चाहर व वॉशिंग्टन सुंदरवर चांगल्या कामगिरीचा दबाव राहील. काेच शास्त्री यांनी स्पष्ट केले की, संघात कायम राहण्यासाठी चांगला खेळ दाखवावा लागेल. 
 

रोहित तिन्ही प्रकारांत सलामी देईल : राठौर
नवे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर यांनी म्हटले की, रोहितने वनडे व टी-२० मध्ये सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी केली. अशात तो कसोटीत यशस्वी होऊ शकतो. राठौरने सामन्यापूर्वी म्हटले की, त्याला कसोटीत संधी दिल्यास तो यशस्वी ठरेल.