Home | International | China | india-america-formula-for-china

भारताचा नवा चीन फॉम्र्युला

वृत्तसंस्था | Update - May 21, 2011, 11:04 AM IST

चीनच्या मुकाबल्यासाठी भारत-अमेरिकेने नवा फॉर्म्युला तयार केलाय.

  • india-america-formula-for-china

    नवी दिल्ली - चीनच्या दिवसेंदिवस वाढणाऱया ताकदीचा विचार करून त्याचा मुकाबला करण्यासाठी भारत - अमेरिकेने नवा फॉम्युला तयार केला आहे.

    तिबेटचा स्वायत्त भाग तसेच पाकव्याप्त काश्मिरात ( पीओके) मध्ये चीन पाय पसरत असून हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. चीनच्या या वाढत्या प्रभावाचा मुकाबला करण्यासाठी लष्करप्रमुख जनरल व्ही.के.सिंग यांनी त्रिस्तरीय रणनितीचा अवलंब करण्याची शिफारस केली आहे. सिंग आणि उच्चपदस्थ अधिकाऱयांची नुकतीच पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत या अहवालावर विचारविनीमय झाला.

    चीनच्या वाढत्या डोकेदुखीला तोंड देण्यासाठी नवे तंत्र अवलंबण्याचा विचार अमेरिकाही करीत आहे. एका अहवालानुसार प्रशांत महासागरात मानवरहित विमानाव्दारे चीनच्या हालचालींवर पाळत ठेवण्याचा अमेरिकेचा विचार आहे.

    यासंदर्भात अमेरिकेकडून कुणीही ठोसपणे काहीही बोलण्यास तयार नाही. मात्र, आशियात ड्रोन विमाने तैनात करण्याचा अमेरिका विचार करीत असल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. व्हाइस ऍडमिरल स्कॉट वॅन ब्रुसकिर्क यांच्या मते चीनच्या विमानवाहू जहाजांवरील क्षेपणास्त्रांचा मुकाबला करण्यासाठी ड्रोन विमाने तैनात करण्यात येऊ शकतात.

Trending