Home | International | China | india-america-working-on-project-china

चीनला थोपविण्यासाठी भारत, अमेरिकेच्या नव्या योजना

वृत्तसंस्था | Update - May 20, 2011, 11:55 AM IST

चीनची वाढत्या ताकदीमुळे चिंतेत असलेल्या भारताने त्याला टक्कर देण्यासाठी काही नव्या उपाययोजनांवर विचार सुरू केलाय.

  • india-america-working-on-project-china

    नवी दिल्ली - चीनची वाढत्या ताकदीमुळे चिंतेत असलेल्या भारताने त्याला टक्कर देण्यासाठी काही नव्या उपाययोजनांवर विचार सुरू केलाय.
    भारताचे लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी तिबेट स्वायत्त भाग आणि पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये चीनच्या वाढत्या प्रभावाला टक्कर देण्यासाठी तीन स्तरिय योजना आखली आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीच्यावेळी या योजनांवर चर्चा करण्यात आली.

    टेकड्यांच्या प्रदेशात घुसखोरांसोबत दोन हात करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आलेली एक तुकडी लष्करामध्ये तयार करण्यात यावी, असे सिंग यांनी सुचविले आहे. तसेच या भागांत वायूसेनेची ताकद वाढविण्याबरोबर पायाभूत सुविधांचा विस्तार करावा, असे त्यांनी सांगितले.

    तिकडे अमेरिकाही चीनच्या वाढत्या प्रभावाला खीळ घालण्यासाठी वेगवेगळ्या नव्या योजना अंमलात आणण्याचा विचार करते आहे. एका अहवालानुसार प्रशांत महासागरात अमेरिका मानवरहित यान वापरण्याच्या विचारात आहे. अमेरिकेचे अधिकारी अधिकृतपणे आता याबाबत काहीही सांगत नाहीत. तरी एका वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका आशियामध्ये ड्रोन तैनात करण्याच्या विचारात आहे.

Trending