आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाला सलग तिसऱ्या वर्षी सर्वाधिक विजयांच्या विक्रमाची संधी, तीन कसाेटी सामन्यांतील विजयाने हाेणार विक्रम नाेंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यातील चार कसाेटी सामन्यांच्या मालिकेला ६ डिसेंबरपासून सुरुवात हाेणार अाहे. मालिकेतील सलामीची कसाेटी अॅडिलेड मैदानावर रंगणार अाहे. भारताला अाता या मालिकेतील तीन कसाेटी विजयांनी अापल्या नावे विक्रमाची नाेंद करता येईल. या कसाेटी जिंकल्याने भारताच्या नावे सलग तिसऱ्या वर्षी सर्वाधिक सामन्यांतील विजयाचा विक्रम नाेंद हाेईल. याशिवाय भारताला ही मालिका अापल्या नावे करण्याची संधी अाहे. हे दाेन्ही संघ मालिकेतील चार कसाेटी सामन्यांत समाेरासमाेर असतील. या दाेन्ही संघांमधील टी-२० सामन्यांची मालिका नुकतीच बराेबरीत राहिली. 

 

यंंदाच्या सत्रात इंग्लंड संघाने २०१८ मध्ये अातापर्यंत सर्वाधिक अाठ कसाेटी सामने जिंकले अाहेत. तसेच भारत अाणि दक्षिण अाफ्रिका संघ अाता प्रत्येकी पाच कसाेटी सामन्यांतील विजयासह दुसऱ्या स्थानावर अाहे. भारताने २०१६ मध्ये ९ अाणि २०१७ मध्ये ७ कसाेटी विजयांची नाेंद केली हाेती. यासह भारताचा संघ २०१७ मध्ये सर्वाधिक विजयांसह नंबर वन हाेता. त्यामुळे पुन्हा एकदा या स्थानावर बाजी मारण्याचा भारताचा प्रयत्न असेल. 

 

सर्वाधिक धावा काढणाऱ्यांत भारताचा कर्णधार काेहली नंबर १ 
भारताचे फलंदाज फाॅर्मात अाहेत. त्यामुळे भारतीय संघ कसाेटी मालिका विजयाचा प्रबळ दावेदार अाहे. फलंदाजांच्या बाबतीत भारताचे खेळाडू अव्वल ठरले. काेहलीने प्रत्येकी ४ शतके व अर्धशतकांसह १०६३ धावा काढल्या अाहेत. यामुळे ताे सर्वाधिक धावांच्या यादीत नंबर वन फलंदाज ठरलेला अाहे. अाॅस्ट्रेलियाकडून ख्वाजाने ५६५ धावा काढल्या अाहेत. त्याच्याशिवाय अाॅस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाने ४०० धावांचा अाकडा गाठला नाही. 

 

घरच्या मैदानावर विजयाची टक्केवारी माेठी 
भारताने सत्रात २०१८ मध्ये पाच कसाेटी सामने जिंकले अाहेत. तसेच अाफ्रिका, अफगाणिस्तान अाणि इंग्लंडविरुद्ध प्रत्येकी एका कसाेटीत भारताला विजयाची नाेेंद करता अाली. यातील इंग्लंडविरुद्ध चार अाणि अाफ्रिकेविरुद्ध दाेन कसाेटीत भारताला पराभवाचा सामनाही करावा लागला. भारताची घरच्या मैदानावरील विजयांची टक्केवारी माेठी ठरली. यातून भारताने घरच्या मैदानावरील अाठपैकी २ कसाेटी जिंकल्या. अाॅस्ट्रेलियाला ९ महिन्यात एकही कसाेटी सामना जिंकता अालेला नाही. अाफ्रिकेविरुद्ध अाॅस्ट्रेलियाने १ मार्च २०१८ ला शेवटचा विजय मिळवला हाेता. त्यानंतर टीमला सलग पराभवाला सामाेरे जावे लागले. 

 

दुसरे : -भारताच्या ४ गाेलंदाजांनी घेतल्या २५ पेक्षा अधिक विकेट 
यंदाच्या सत्रात गाेलंदाजांच्या विश्वात भारताचे खेळाडू चमकले. भारताच्या चार गाेलंदाजांनी अातापर्यंत सत्रामध्ये २५ पेक्षा अधिक विकेट घेतल्या अाहेत. यात शमी (३३), अश्विन (३२), ईशांत शर्मा (३०) अाणि बुमराहने (२८) असा पराक्रम गाजवला अाहे. तर, अाॅस्ट्रेलियाचा अाॅफ स्पिनर नॅथन हाच यशस्वी गाेलंदाज ठरला. त्याने ३२ विकेट घेतल्या अाहेत. तसेच पॅट कमिन्सच्या नावे ३० बळींची नाेंद अाहेे. हे दाेघेच यादरम्यान चमकले. 

 

तिसरे : भारताची सात वेळा ३०० पेक्षा अधिक धावसंख्या 
भारताने यंदाच्या ११ कसाेटींमधील सात डावांत ३०० पेक्षा अधिक धावा काढल्या अाहेत. टीमने अापल्या घरच्या मैदानावर राजकाेट येथे विंडीजविरुद्ध ९ बाद ६४९ धावा काढल्या हाेत्या. तसेच भारताच्या फलंदाजांनी सर्वाधिक ११ शतके साजरी केली अाहेत. याच्या तुलतेन अाॅस्ट्रेलियन संघाची कामगिरी सुमार ठरली. या टीमला तीन वेळा ३०० पेक्षा अधिक धावसंख्या करता अाली. 

बातम्या आणखी आहेत...