आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वनडे जिंकल्यास टीम इंडियाचे हाेमग्राऊंडवर विजयाचे द्विशतक; भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात मंगळवारपासून लढत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो

मुंबई - भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला १४ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना मुंबईत खेळवला जाईल. टीम इंडियाने मालिकेत २ सामने जिंकल्यास तो देशात २०० सामने जिंकणारी जगातील दुसरी टीम बनेल. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया संघाने अशी कामगिरी केली आहे. दोघांत आतापर्यंत ११ द्विपक्षीय वनडे मालिका खेळवण्यात आल्या आहेत. भारताने पाच आणि ऑस्ट्रेलियाने सहा मालिका जिंकल्या. नुकतीत भारतीय  संघाने क्रिकेटच्या झटपट टी-२० फाॅरमॅटची मालिका जिंकली अाहे. भारताने घरच्या मैदानावर पाहुण्या  श्रीलंका संघाला मालिकेत धुळ चारली. 


घरच्या मैदानावर  ऑस्ट्रेलियाचा संघ आपल्यापेक्षा वरच
ढ :


भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान वनडेत आतापर्यंत १३७ सामने खेळवण्यात आले. ऑस्ट्रेलियाने ७७ आणि भारताने ५० सामने जिंकले. १० सामन्यांचा निकाल लागला नाही. दुसरीकडे भारतात दोघांत ६१ वनडे सामने खेळवण्यात आले. भारताने २७ आणि ऑस्ट्रेलियाने २९ सामने जिंकले आहेत. म्हणजे आपल्या देशात ऑस्ट्रेलिया टीम आपल्यावर वरचढ आहे. दोघांत अखेरची द्विपक्षीय वनडे मालिका मार्च २०१९ मध्ये भारतात खेळवण्यात आली. ऑस्ट्रेलियाने मालिकेत ३-२ ने जिंकली होती. भारताने मालिकेपूर्वी दोन सामने जिंकले होते. मात्र, अखेरचे ३ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकून मालिकेवर कब्जा केला होता. त्यामुळे संघ वरचढ आहे.

तिन्ही प्रकारांत ७५० सामने जिंकण्याची संधी 

टीम इंडियाने या मालिकेत दोन सामने जिंकले, तर तिन्ही प्रकारांत (कसोटी, वनडे, टी-२०) एकूण ७५० सामने जिंकण्याची संधी आहे. सध्या भारताने ७४८ सामने जिंकले आहेत. यात १५७ कसोटी, ५११ वनडे आणि ८० टी-२० सामने आहेत. आतापर्यंत केवळ २ संघ ७५० पेक्षा अधिक सामने जिंकू शकले आहेत. विराट कोहलीला सहाव्या स्थानासाठी १३१ धावांची गरज


विराट  कोहलीने वनडेमध्ये आतापर्यंत २४२ सामन्यांतील २३३ डावात ११६०९ धावा काढल्या. यात ४३ शतके आणि ५५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने  १३१ धावा केल्या, तर तो वनडेत सर्वाधिक धावांच्या बाबतीत पाकिस्तानच्या इंझमाम उल हकला (११७३९) मागे सोडत सहाव्या स्थानी पोहोचेल. सचिन तेंडुलकर (१८४२६) पहिल्या,  संगकारा (१४२३४) दुसऱ्या, रिकी पाँटिंग (१३७०४) तिसऱ्या,  जयसूर्या (१३४३०) चौथ्या स्थानी आहे.

बातम्या आणखी आहेत...