आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - श्रीलंकेविरुद्ध मालिका विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेला यजमान भारतीय संघ आता वनडेची सिरीज आपल्या नावे करण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी भारताला आपल्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामाेरे जावे लागेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला आज मंगळवारपासून सुरुवात हाेत आहे. मुंबईच्या वानखेडेवर सलामीचा सामना रंगणार आहे. तब्बल १३ वर्षांनंतर हे दाेन्ही संघ या मैदानावर झंुजणार आहेत. आतापर्यंत या ठिकाणी तीन सामने झाले. यात ऑस्ट्रेलियन संघाने वर्चस्व राखले. ऑस्ट्रेलियाने दाेन विजयांसह आघाडी घेतली हाेती. भारताने या मैदानावर आतापर्यंत आेव्हरऑल १८ सामने खेळले आहेत. यातील १० सामन्यांत विजयाची नाेंद करताना भारताने आठ लढती गमावल्या आहेत. तसेच या मैदानावरील शेवटच्या दाेन वनडेतही भारताचा पराभव झालेला आहे.
ऑक्टाेबर २०१७ मध्ये न्यूझीलंडने सहा गड्यांनी आणि २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेने २१४ धावांनी भारतावर मात केली हाेती.अशात भारतीय संघाला आता या मैदानावर िवजयासाठी माेठी कसरत करावी लागेल. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात ६१ सामने झाले. यातील २७ सामने भारताने आणि २९ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गतवर्षी २०१९ मध्ये एकूण ९ वनडे सामने झाले. पाच सामने भारताने जिंकले व चार सामने गमावले.
राेहित, काेहली करणार सचिनचा विक्रम ब्रेक
राेहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३७ डावांत २०३७ धावा काढल्या. यात सात शतकांसह आठ अर्धशतकांचा समावेश आहे. काेहलीने ३५ डावांत १७१७ धावा काढल्या. यात ८ शतकांसह सहा अर्धशतके साजरी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत सर्वाधिक नऊ शतकांची नाेंद सचिनच्या नावे आहे. आता याच विक्रम ब्रेक हाेण्याची शक्यता आहे.
बुमराहच्या ११ सामन्यात १७ विकेट
विश्वचषकानंतर वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराह आता पहिला वनडे सामना खेळणार आहे. त्याने नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांत अव्वल कामगिरी केली. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंतच्या ११ सामन्यांत १७ विकेट घेतल्याची नाेंद आहे. रवींद्र जडेजाने ३० सामन्यांत २३, कुलदीपने १२ सामन्यांत १९ आणि चहलने ७ सामन्यांत १५ बळी घेतले.
धवन, राहुलच्या संधीने खालच्या स्थानावरून खेळणार : काेहली
शिखर धवन आणि लाेकेश राहुल खेळल्यास आपण खालच्या स्थानावरून फलंदाजी करू शकताे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार विराट काेहलीने दिली. ‘फाॅर्मात असलेले खेळाडूच संघात महत्त्वाचे असतात. त्यामुळे चांगली खेळी करणाऱ्यांनाच संधी मिळण्याची गरज असते. अशशत राेहित, शिखर धवन आणि राहुल आघाडीवर आहेत. यांच्यामध्ये माेठ्या खेळीची क्षमता आहे. त्याचा निश्चित असा माेठा फायदा संघाला हाेऊ शकताे, असेही ताे म्हणाला.
संभाव्य संघ
शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केदार जाधव, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, मोहंमद शमी, जसप्रीत बुमराह.
डेव्हिड वॉर्नर, अॅराेन फिंच, स्टीव्ह स्मिथ, लबुशेन, पीटर हॅड्सकॉम्ब, एलेक्स केरी, एस्टन एगर, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोस हेजलवूड, अॅडम झम्पा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.