आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-पाकने याेग्य दिशेने पुढे जायला हवे!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत - पाकिस्तानदरम्यान अशा शत्रुत्वाच्या भावनेमुळेच मैत्रीची चर्चा करणे कठीण हाेऊन बसले अाहे. इम्रान खान यांना विराेधी पक्षांकडून बरीच टीका सहन करावी लागेल, परंतु त्यांचे खच्चीकरण करायला नकाे. इम्रान खान अाणि नवज्याेत सिद्धूचा अनुभव सारखाच असेल. मला वाटते की, अाम्हाला अाता याेग्य दिशेने पावले टाकायला हवीत. कमीत कमी अाम्ही द्विपक्षीय क्रिकेट मालिका सुरू केली पाहिजे अाणि यात्रेकरूंसाठी व्हिसामध्ये सवलती दिल्या पाहिजेत. 


भारतीय अाणि पाकिस्तानींना परस्परांच्या विराेधात क्रिकेट सामना खेळायला अावडते, परंतु दाेघांनाही पराभवाचा जबरदस्त तिटकारा अाहे. गतवर्षी जेव्हा लंडनमध्ये पाकिस्तानने चॅम्पियन्स चषकाच्या अंतिम सामन्यात भारताला पराभूत केले हाेते त्या वेळी लाहाेरपासून कराचीपर्यंत सारा देश जल्लाेषात नाचत हाेता. त्या वेळी एका टीव्हीवरील टाॅक शाेमध्ये मी म्हणालाे हाेताे, हा एका देशाने दुसऱ्या देशावर मिळवलेला विजय नव्हे; तर त्या खेळाचा विजय अाहे, ज्याने दाेन्ही राष्ट्रांना परस्परांशी बांधून ठेवले अाहे. घृणा अाणि तिरस्काराला खतपाणी घालणाऱ्या मानसिकतेचा हा पराभव अाहे. त्यानंतर बऱ्याच काही महा-देशभक्तांनी मला गद्दार ठरवले हाेते. 


गेल्या बुधवारी भारताने संयुक्त अरब अमिरातीत खेळल्या गेलेल्या अाशिया चषक सामन्यात पाकिस्तानला पराभूत केले अाणि भाेपाळपासून पाटणा अाणि दिल्लीपासून काेलकात्यापर्यंत उत्सवी जल्लाेष साजरा झाला. गुरुवारी सकाळी जेव्हा मी इस्लामाबादमध्ये काही मित्रांना भेटलाे तेव्हा त्यांनी मला सांगितले की, या पराभवामुळे अाम्ही रात्रभर नीट झाेपू शकलाे नाहीत. अर्थातच हे एेकून मला हसू अाले. एकाने विचारले, अामच्या पराभवाची तुम्ही मस्करी करताय का? मी म्हणालाे, हे युद्ध नव्हे. भारतीय संघ चांगला खेळला अाणि त्यामुळे ताे जिंकला. पाकिस्तान वाईट पद्धतीने खेळला त्यामुळे ताे पराभूत झाला. या मुद्द्याला राष्ट्राभिमानाचा विषय बनवू नये. एका मित्राने विचारले, अापण भारताच्या या विजयावर खुश अाहात का? मी म्हणालाे की, हाे, खुश अाहे. भारताने पाकिस्तानसाेबत एक सामना खेळला अाणि ते जिंकले, कारण ते चांगले खेळले. बुधवारी रात्री माझ्या काही भारतीय मित्रांना या विजयाच्या शुभेच्छा व्हाॅट्सअॅप वरून दिल्या अाणि मी निद्राधीन व्हायला निघालाे. तेवढ्यात माझ्या डाॅक्टर मित्राचा सूर बदलला. ताे म्हणाला, याचा अर्थ तुम्ही सामान्य अाणि मी असामान्य व्यक्ती अाहे. मला हसू अावरले नाही अाणि म्हणालाे 'तुम्ही असामान्यच नाही, तर अति संवेदनशील अाहात, कारण प्रसार माध्यमांनी क्रिकेटच्या नावावर अनावश्यक अंध-देशभक्ती निर्माण केली अाहे.' माझ्या मित्राने अापल्या फाेनवर एक मेसेज लिहिण्यास सुरुवात केली. काही सेकंदांनंतर त्यांनी मला मेसेज दाखवला, 'प्रिय, डाॅ. माेहन, भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाबद्दल शुभेच्छा. हा संदेश पाठवण्यास विलंब झाल्याबद्दल क्षमस्व. काल रात्री प्रकृती ठीक नव्हती. वहिनींना नमस्कार.' पाकिस्तानहून डाॅ. इक्बाल. 


डाॅ. माेहन यांना हा मेसेज पाठवल्यानंतर डाॅ. इक्बाल हसू लागले. त्यांच्या मनातील तणाव नाहीसा झाला हाेता. त्यांना विश्वास हाेता की, जेव्हा केव्हा पाकिस्तान भारताविरुद्ध क्रिकेट सामना जिंकेल तेव्हा डाॅ. माेहन हे निश्चित त्यांना शुभेच्छा संदेश जरूर पाठवतील. दाेघांनी अमेरिकेत साेबत शिक्षण घेतलेले अाणि सामान्यत: यूएई किंवा ब्रिटनमध्ये एकमेकांना भेटत असतात. अाता डाॅ. इक्बाल म्हणत हाेते की, कधी कधी अाम्ही लहानसहान गाेष्टींतून माेठमाेठ्या समस्या निर्माण करत असताे. मी त्यांना काही अाठवड्यांपूर्वीच इस्लामाबादेतील प्रेसिडेंट हाऊसमध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू नवज्याेतसिंग सिद्धूशी माझी भेट झाल्याचे सांगितले. जेव्हा जनरल बाजवा दालनात अाले अाणि उजवीकडे निघाले. तेथे सगळ्यात पुढच्या रांगेत सिद्धू बसलेला हाेता. ते सिद्धूकडे वळले अाणि अत्यानंदाने गळाभेट घेतली. या मैत्रीपूर्ण पुढाकाराला नकार देण्याचा किंवा त्यापासून स्वत:चा बचाव करण्याचा काेणताही पर्याय त्यांच्यासमाेर नव्हता. काही वेळेपर्यंत जनरल बाजवा अाणि सिद्धू यांच्यात करतारपूर गुरुद्वाराच्या संदर्भात चर्चा झाली, जेथे गुरू नानकदेव यांनी देहत्याग केला हाेता. बाजवा म्हणाले, पाकिस्तान शीख यात्रेकरूंना करतारपूर गुरुद्वारात जाण्यास अनुमती देण्यास तयार अाहे. हे तीर्थस्थळ गुरुदारपूर सीमेपासून केवळ तीन किलाेमीटर अंतरावर अाहे. 


जेव्हा पंतप्रधान इम्रान खान यांचा शपथविधी समारंभ पार पडला तेव्हा काही प्रशंसकांनी सिद्धूला घेरले हाेते. सिद्धू त्याच दिवशी दुपारी सिनेटर फैसल जावेद खान यांनी अायाेजित केलेल्या स्नेहभाेजनास हजर राहिला. त्यास कल्पना नव्हती की, याच वेळी पंतप्रधान इम्रान खानशी भेट हाेणार अाहे. मी सिद्धूच्या लक्षात अाणून दिले हाेते की, पाकिस्तानी सेनाप्रमुखाच्या 'झप्पी'मुळे अापल्या देशात अडचणीत येऊ शकतील. त्याला विश्वास हाेता की, काहीही वाईट घडणार नाही. परंतु मी त्यास म्हणालाे की, अाम्ही एकसारखे लाेक अाहाेत, अाम्ही एकमेकांना अाेळखताे, एकमेकांविषयी अादर अाणि तिरस्कारदेखील करताे. लहानसहान बाबींमधून माेठे प्रश्न निर्माण करण्यात अाम्ही तरबेज अाहाेत. ते म्हणाले, काही दिवस अडचणीचे असतील, त्यानंतर चांगले दिवस येतील. जेव्हा सिद्धू भारतात परतले त्या वेळी त्यांना माेठ्या वादळाचा सामना करावा लागला. कट्टरपंथीयांनी तर त्यांना गद्दार घाेषित करून टाकले. जेव्हा सिद्धूवर कडाडून टीका हाेत हाेती त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र लिहिले अाणि विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. परराष्ट्रमंत्री शाह महेमूद कुरेशी यांनी २० अाॅगस्ट राेजी ही बाब जाहीरपणे सांगितली. पुन्हा पाकिस्तानकडून महिनाभर माैन बाळगले गेले. त्यानंतर २० सप्टेंबरला काही भारतीय वृत्तपत्रांनी बातमी दिली की, पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पत्र पाठवून दाेन्ही देशांमध्ये रचनात्मक अाणि सार्थक संवादाच्या गरजेवर भर दिला. त्यांनी सल्ला दिला की, संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या निमित्ताने न्यूयाॅर्कमध्ये काही दिवसांनंतर त्यांचे परराष्ट्रमंत्री कुरेशी हे सुषमा स्वराज यांना भेटू शकतील. इम्रान खान यांच्या काही टीकाकारांनी निवडणूक रॅलीत दिलेल्या भाषणाची अाठवण करून दिली, जिथे त्यांनी नवाझ शरीफ यांना 'माेदीचा यार' असे घाेषित केले हाेते. लाेक इम्रान खानवर टीका करू लागले. 'अाता तुम्ही माेदींचा यार बनण्याचा प्रयत्न करत अाहात का?' दुर्दैव असे की, भारत - पाकिस्तानदरम्यान अशा शत्रुत्वाच्या भावनेमुळेच मैत्रीची चर्चा करणे कठीण हाेऊन बसले अाहे. इम्रान खान यांना विराेधी पक्षांकडून बरीच टीका सहन करावी लागेल, परंतु त्यांचे खच्चीकरण करायला नकाे. इम्रान खान अाणि नवज्याेत सिद्धूचा अनुभव सारखाच असेल. मला वाटते की, अाम्हाला अाता याेग्य दिशेने पावले टाकायला हवीत. कमीत कमी अाम्ही द्विपक्षीय क्रिकेट मालिका सुरू केली पाहिजे अाणि यात्रेकरूंसाठी व्हिसामध्ये सवलती दिल्या पाहिजेत. कल्पना करा, पाकिस्तान काेलकात्यात क्रिकेट सामना खेळत अाहे अाणि भारतीय संघ कराचीत. हजाराे पाकिस्तानी सामना पाहण्यासाठी भारतात येतील अाणि हजाराे भारतीय क्रिकेटप्रेमी सामन्याचा अानंद लुटण्यासाठी पाकिस्तानात जातील. परस्परांना भेटण्याची, शुभेच्छा देण्याची त्यांना संधी मिळेल. दाेघेही एकमेकांना नव्हे, तर दाेघेही द्वेष अाणि तिरस्काराला पराभूत करतील. हा दुहेरी विजय असेल. अापण सर्वाेत्तमाची अपेक्षा करूया, सामान्य लाेकांसारखे राहूया. मी माझ्या साऱ्या भारतीय मित्रांना अाणि वाचकांना बुधवारच्या त्यांच्या क्रिकेट संघाच्या विजयाबद्दल शुभेच्छा देताे, कृपया पाकिस्तानच्या वतीने शुभेच्छांचा स्वीकार करावा. 

 

- हामिद मीर पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार
Twitter : @HamidMirPAK 

बातम्या आणखी आहेत...