आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टर्नरच्या नाबाद खेळीने ऑस्ट्रेलियाचा विजय; मालिकेत 2-2 ने बराेबरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली - पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने मालिका विजयाच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या यजमान टीम इंडियाला रविवारी धक्का दिला.  टर्नरच्या (नाबाद ८४ ) झंझावाती खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलिया संघाने चाैथ्या वनडेत ४ गड्यांनी राेमहर्षक विजयाची नाेंद केली.   


भारताने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद ३५८ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने सहा गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले.  ऑस्ट्रेलियाने सलग दुसरा विजय संपादन केला. यासह टीमने मालिकेत २-२ ने बराेबरी साधली. आता मालिकेतील पाचवा व शेवटचा वनडे सामना बुधवारी हाेईल.  


भारताकडून राेहित-धवनचा झंझावात : सलामीवीर राेहित शर्मा (९५) आणि शिखर धवनच्या (१४३) शतकी भागीदारीचे माेलाचे याेगदान ठरले. त्यांनी संघाला १९३ धावांची भागीदारीची महत्त्वपूर्ण सलामी दिली. यासह त्यांनी आघाडीची फळीही मजबूत असल्याचे सिद्ध केले. ही जगातील सर्वात यशस्वी तिसरी सलामीची जाेडी ठरली आहे. त्यांनी वनडेमध्ये १५ व्यांदा शतकी भागीदारी रचली आहे. त्यांनी हा पराक्रम १०० व्या डावात करून दाखवला. 


टर्नरच्या अर्धशतकी खेळीतून सामन्याला मिळाली कलाटणी
खडतर ३५९ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाकडून युवा फलंदाज अॅस्टाेन टर्नरची अर्धशतकी खेळी लक्षवेधी ठरली. त्याने झंझावाती खेळी करताना सामन्याला कलाटणीच दिली. या वेळी त्याला दाेन वेळा जीवनदान मिळाले. याचाच फायदा घेत त्याने विजयश्री यशस्वीपणे खेचून आणली. 


१७ डावांनंतर धवनची शतकी खेळी; राेहितचे पुनरागमन
मालिकेतील पहिल्या तीन सामन्यातील अपयशाने अडचणीत सापडलेल्या सलामीवीर शिखर धवनने आता चाैथ्या वनडेत दमदार पुनरागमन केले. त्याने आपल्या झंझावाती खेळीच्या बळावर आता सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यादरम्यान त्याने करिअरमधील १६ वे वनडे शतक साजरे केले. त्याने १७ डावानंतर शतकी खेळी केली.  यासह त्याच्या नावे लिस्ट ए मधील १० हजार धावा पुर्ण झाल्या.  या वेळी त्याला राेहितची माेलाची साथ मिळाली. या दाेघांनी पहिल्या गड्यासाठी ३१ षटकांमध्ये १९३ धावांची शानदार भागीदारी रचली. यामुळे टीमला धावांचा डाेंगर उभा करता आला. 


रोहित सर्वात कमी डावांत घरच्या मैदानावर ३ हजार धावा पूर्ण करणारा एकमेव फलंदाज
सलामीवीर राेहितने दमदार पुनरागमन करताना ९५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यादरम्यान त्याने आपल्या घरच्या मैदानावर  वनडेत ३ हजार धावा पूर्ण केल्या. त्याने ५७ डावांतून हा पल्ला गाठला.  यासह ताे जगातील संयुक्तपणे एकमेव फलंदाज ठरला.  असा पराक्रम नंबर वन हाशिम आमलानेही गाजवला आहे. त्याने ५७ डावांतच हा पल्ला गाठलेला आहे.  

बातम्या आणखी आहेत...