आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 वर्षांनंतर अाॅस्ट्रेलियाविरुद्ध 2-1 ने अाघाडी घेण्याची भारताला संधी!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - गत सामन्यातील पराभवातून सावरलेल्या भारतीय संघाची नजर अाता यजमान अाॅस्ट्रेलियाला तिसऱ्या कसाेटीमध्ये पराभूत करण्यावर लागली अाहे. याच विजयाने टीम इंडियाला यजमानांविरुद्धच्या चार कसाेटी सामन्यांच्या मालिकेमध्ये २-१ ने अाघाडी घेण्याची संधी अाहे. यातून भारताच्या नावे ४० वर्षांनंतर यजमान अाॅस्ट्रेलियावर कसाेटी मालिकेमध्ये २-१ ने अाघाडी घेण्याची कामगिरी नाेंद हाेईल. यापूर्वी भारताने १९७७-७८ च्या दाैऱ्यात असा पराक्रम गाजवला हाेता. अाता यासाठी टीम इंडिया उत्सुक अाहे. 

 

भारत अाणि यजमान अाॅस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसाेटीला बुधवारपासून सुरुवात हाेईल. दाेन्ही संघांनी प्रत्येकी एका विजयासह मालिकेमध्ये १-१ ने बराेबरी साधली अाहे. त्यामुळे अाता मेलबर्न येथील तिसऱ्या कसाेटीत दाेन्ही संघांच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल. गत कसाेटीमध्ये विजय संपादन करून यजमान अाॅस्ट्रेलिया संघाने मालिकेत पुनरागमन केले अाहे. त्यामुळे अाता पराभवातून सावरलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या कसाेटीत विजय मिळवण्यासाठी कंबर कसली. यासाठी टीमने कसून सराव केला. 

 

मेलबर्न खेळपट्टीवर सर्वांची नजर : पहिल्या कसाेटी रंगतदार कसाेटीनंतर अाता सर्वांची नजर मेलबर्न येथील तिसऱ्या कसाेटीवर लागली अाहे. येथील खेळपट्टी अधिक चर्चेची अाहे. या ठिकाणी गतवर्षी अाॅस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यातील कसाेटी अनिर्णित राहिली हाेती. त्यामुळे सुरुवातीचे दाेन दिवस वेगवान गाेलंदाजांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता अाहे. अाॅस्ट्रेलियाचा हॅरिसने या ठिकाणी प्रथम श्रेणी सामन्यात २५० धावांची खेळी केली. 

 

संघ निवडीवर भारताचा विजय निश्चित 
मेलबर्न कसाेटीतील विजयासाठी अाता भारतीय संघाच्या निवडीचा निर्णय महत्त्वाचा ठरेल. लाेकेश राहुल अाणि मुरली विजय हे अातापर्यंत कसाेटीत अपयशी ठरलेले अाहेत. त्यामुळेच लाेकेश राहुलला विश्रांती देण्याचे जवळपास निश्चितच मानले जाते. त्याच्या जागी मयंक अग्रवालची निवड हाेण्याचे चित्र अाहे. यातून अाता राेहित शर्मा व हनुमा विहारीचा सलामीचा पर्याय माेकळा झाला. टीम ४ वेगवान गाेलंदाजांसह मैदानावर उतरल्यास फायदा हाेईल. अाता संघ तीन वेगवान गाेलंदाज, हार्दिकच्या रूपात एक अाॅलराऊंडर अाणि एक फिरकीपटूसह मैदानावर उतरण्याची शक्यता अाहे. 

 

संभाव्य संघ : 
भारत : विराट काेहली (कर्णधार), मुरली विजय, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, हार्दिक, रवींद्र जडेजा, माे. शमी, इशांत शर्मा, बुमराह. 
अाॅस्ट्रेलिया : टीम पॅन, मार्कस हॅरिस, अॅराेन फिंच, उस्मान ख्वाजा, शाॅन मार्श, मिशेल मार्श, ट्रेव्हिस हेड, टीम पॅन, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, नॅथन, जाेश हेझलवुड. 

 

मिशेल मार्शला संधी 
दुसऱ्या कसाेटीमधील विजयाने यजमान अाॅस्ट्रेलिया टीमचा अात्मविश्वास द्विगुणीत झाला. त्यामुळे अाता हीच लय कायम ठेवण्यासाठी यजमानांनी कंबर कसली. यासाठी टीममध्ये बदल हाेण्याची शक्यता अाहे. यातून हँडसकाेम्बच्या जागी अाॅलराऊंडर मिशेल मार्शला संधी मिळण्याचे चित्र अाहे. यातून यजमानांची गाेलंदाजीची धार अधिक अाक्रमक हाेईल.
 
उद्या बुधवारपासून भारत व अाॅस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसाेटीला सुरुवात 
धाेनीचे टी-२० संघात कमबॅक 
अाॅस्ट्रेलियाविरुद्ध वनडे, किवीविरुद्ध वनडे व टी-२० मालिका; संघ जाहीर 

नवी दिल्ली | माजी कर्णधार महेंद्रसिंग धाेनीचे अाता भारताच्या टी-२० संघात पुनरागमन झाले अाहे. त्याची अाता अागामी न्यूझीलंडविरुद्ध हाेणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली. तसेच त्याला अाॅस्ट्रेलिया अाणि न्यूझीलंडविरुद्ध हाेणाऱ्या वनडे मालिकेसाठी संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. त्याला गत दाेन टी-२० संघात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळेच अाता त्याच्या निवडीवर चर्चा रंगत अाहे. यातून अाता निवड समिती पुढच्या वर्षी हाेणाऱ्या विश्वचषकापूर्वी अधिकाधिक अांतरराष्ट्रीय सामने धाेनीला खेळवण्याची शक्यता अाहे. त्यामुळे अाता त्याच्या खेळीकडे या मालिकेत सर्वांची नजर असेल. 

 

अाॅस्ट्रेलियाविरुद्ध व न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघ : विराट काेहली (कर्णधार), राेहित शर्मा (उपकर्णधार), लाेकेश राहुल, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धाेनी, हार्दिक, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, माे. शमी. 

 

न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ: विराट काेहली (कर्णधार), राेहित शर्मा (उपकर्णधार), लाेकेश राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धाेनी, हार्दिक, क्रुणाल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद. 

बातम्या आणखी आहेत...