आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केदार जाधवचा पाचव्यांदा फायनलमध्ये ५०+ स्कोअर; इंडिया ब संघाने पटकावली देवधर ट्राॅफी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - इंडिया ब संघाने साेमवारी देवधर ट्राॅफी पटकावली. या संघाने फायनलमध्ये इंडिया क संघाचा पराभव केला. ब संघाने ५१ धावांनी सामना जिंकला. यासह  इंडिया ब संघ किताबाचा मानकरी ठरला.           या फायनलमध्ये मुंबईच्या केदार जाधवने  (८६) झंझावाती अर्धशतकी खेळी केली. यासह त्याने आपल्या नावे वेगळ्या कामगिरीची नाेंद केली.  त्याच्या नावे आता पाचव्यांदा फायनलमध्ये ५०+ चा स्काेअर नाेंद झाला आहे. त्याने या सामन्यात ८६ धावांची खेळी केली. याच्या बळावर त्याने भारताच्या माजी क्रिकेटपटू मनाेज प्रभाकर यांच्या कामगिरीशी बराेबरी साधली. त्यांच्याही नावे पाच वेळा ५०+ चा स्काेअर नाेंद आहे.  त्यानंतर असा पराक्रम केदार जाधवने गाजवला आहे. त्याची सामन्यातील झंझावाती खेळी उल्लेखनिय ठरली.            आता इंडिया ब संघाने प्रथम फलंदाजी करताना  ७ बाद २८३ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात इंडिया संघाला ९ गड्यांच्या माेबदल्यात अवघ्या २३२ धावांपर्यंत मजल मारता आली.  स्पिनर शाहबाज नदीमने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अव्वल फलंदाजांना अडकवले. त्याने फिरकीची जादू करून सामन्यात चार विकेट घेतल्या. ब संघाकडून यशस्वी जायस्वालने ५४ धावांची खेळी केली. त्यानंतर केदार जाधव आणि नितिश राणाने (२०) पाचव्या विकेटसाठी  ७९ धावांची भागीदारी रचली. 

बातम्या आणखी आहेत...