आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत आणि बांगलादेश यांचा आज सामना; भारत जिंकल्यास उपांत्य फेरीत प्रवेश 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंगहॅम - टीम इंडिया विश्वचषकात आपला आठवा सामना मंगळवारी बांगलादेशविरुद्ध खेळेल. टीमने सामना जिंकल्यास सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश करेल. गेल्या सामन्यात इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर टीमच्या प्रदर्शनावर टीका होत आहे. कारण पाच विकेट शिल्लक असतानादेखील टीमने अखेरच्या ५ षटकांत वेगवान धावा काढण्याचा प्रयत्न केला नाही. दुसरीकडे बांगलादेश पराभूत झाल्यास उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर होईल. प्रत्येक टीम इतिहासातील चांगल्या प्रदर्शनाची पुनरावृत्ती करू इच्छित आहे. टीम इंडियाकडेदेखील अशी संधी आहे. जून २०१७ मध्ये याच मैदानावर भारताने बांगलादेशला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ९ गड्यांनी पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. 


त्या सामन्यात रोहितने १२३ आणि कोहलीने नाबाद ९६ धावा काढल्या होत्या. टीम आता येथील सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश करू इच्छिते. टीम इंडियाचे स्पर्धेतील प्रदर्शन चांगले आहे. रोहितने तीन शतके झळकावली. राहुलने केवळ एकच अर्धशतक ठोकले. त्याला महत्त्वाच्या सामन्यात चांगले प्रदर्शन करावे लागेल. पांड्यानेदेखील चांगले प्रदर्शन केले. गेल्या सामन्यात चहल आणि कुलदीप महागडे ठरले. 


शाकिबकडून आशा 
बांगलादेशसाठी हा सामना करा किंवा मरा असा आहे. यात शाकिबकडून पुन्हा एकदा चांगल्या प्रदर्शनाची आशा आहे. त्याने ६ सामन्यांत २ शतके आणि ३ अर्धशतकांसह ४७६ धावा काढल्या. १० विकेट घेतल्या. यष्टिरक्षक रहीमने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली. सलामीवीर तमीमन अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन केले नाही. त्याने केवळ एकच अर्धशतक काढले. गोलंदाजीत कर्णधार मुर्तुझाचे प्रदर्शन खराब राहिले. त्याने ६ सामन्यांत केवळ एक विकेट घेतली. मुस्तफिजुर रहमान आणि सैफुद्दीनने १०-१० विकेट घेतल्या. दोन्ही संघांनी विश्वचषकात आतापर्यंत ३-३ वेळा ३०० पेक्षा अधिक धावा काढल्या आहेत.