आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण आफ्रिकेचे भारतीय गोलंदाजांपुढे लोटांगण; भारताचा आफ्रिकेवर एक डाव आणि 137 धावांनी विजय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क - भारताने पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 137 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताचा घरच्या मैदानावर 11 वा मालिका विजय आहे. भारतीय संघाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी बढत मिळवली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा सर्वात मोठा विजय आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला गेल्या वेळी 2010 मध्ये एक डाव आणि 57 धावांनी पराभूत केले होते. पहिल्या डावात नाबाद 254 धावा करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीला सामनावीर घोषित करण्यात आले. 

भारताने पहिल्या डावात 5 गड्यांच्या मोबदल्यात 601 धावांवर आपला डाव घोषित केला होता. यानंतर मैदानावर उतलेला दक्षिण आफ्रिकेचा संघाला 275 धावांपर्यंत मजल मारता आली. यानंतर भारताने आफ्रिकेला फॉलोऑन दिला. दक्षिण आफ्रिकेचा संघाला दुसऱ्या डावात 189 धावा करता आल्या. याअगोदरचा पहिला सामना भारताने 203 धावांनी जिंकला होता. आता तिसरा सामना 19 ऑक्टोबर रोजी रांजी येथे होणार आहे. 
 

उमेश-जडेजाने दुसऱ्या डावात 3-3 गडी बाद केले
दक्षिण आफ्रिकेकडून दुसऱ्या डावात डीन एल्गरने सर्वाधिक 48 धावा केल्या. टेम्बा बवुमाने 38, वर्नोन फिलँडरने 37 आणि केशव महाराजने 22 धावांचे योगदान दिले. भारतासाठी उमेश यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. अश्विनने 2 तर इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीला प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश मिळाले. 
 

भारताने आफ्रिकेला पहिल्यांदा फॉलोऑन दिला
भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदा फॉलोऑन दिला. सोबतच दक्षिण आफ्रिकेला 2008 नंतर फॉलोऑन देणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. जुलै 2008 मध्ये इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन दिले होते. हा सामाना अनिर्णित राहिला होता.