आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Beat Bangladesh By 30 Runs, Deepak Chahar Becomes The First Indian Bowler To Score A Hat trick In T 20

भारताची बांग्लादेशवर 30 धावांनी मात, दीपक चहर टी-२० मध्ये हॅट्ट्रीक करणारा पहिला भारतीय गाेलंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - शिवम दुबे (३/३०) आणि दीपक चहरच्या (६/७) धारदार गाेलंदाजीच्या बळावर यजमान टीम इंडियाने रविवारी बांगलादेशवर मालिका विजय मिळवला. दीपक चहरने विकेटची हॅट््ट्रिक केली. अशा प्रकारे टी-२० मध्ये हॅट््ट्रिक करणारा ताे भारताचा पहिला गाेलंदाज  ठरला.  त्याने दाेन षटकांत हा पराक्रम गाजवला आहे. 
भारताने तिसऱ्या व शेवटच्या टी-२० सामन्यात बांगलादेश संघाचा पराभव केला. भारताने ३० धावांनी सामना जिंकला. यासह भारताने तीन टी-२० सामन्यांची मालिका २-१ ने आपल्या नावे केली. नईमची (८१) झंुज अपयशी ठरली आहे. येत्या गुरुवारपासून भारत व बांगलादेश  यांच्यातील २ कसाेटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेईल.  

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश टीमसमाेर विजयासाठी १७५ धावांचे टार्गेट ठेवले हाेते. प्रत्युत्तरात बांगलादेश संघाला १४४ धावांवर गाशा गुंडाळावा लागला. टीमकडून नईमने एकाकी झंुज दिली. मात्र, इतर फलंदाजांना फार काळ मैदानावर आव्हान कायम ठेवता आले नाही. 


श्रेयसचे  पहिले अर्धशत
क : 
भारताकडून श्रेयस अय्यरने  शानदार ६२ धावांची खेळी केली. यासह त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट करिअरमधील आपले पहिले अर्धशतक साजरे केले. याशिवाय संघाकडून लाेकेश राहुलने (५२) वैयक्तिक अर्धशतकी खेळी करताना संघाच्या धावसंख्येेला गती दिली.
 

दीपक चहरचे सर्वाधिक ६ बळी;  तिसरा गाेलंदाज 
दीपक चहरने आपल्या शानदार गाेलंदाजीच्या बळावर बांगलादेशचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. त्याने ३.२ षटकांमध्ये अवघ्या ७ धावा देताना ६ विकेट घेतल्या. अशा प्रकारे टी-२० च्या सामन्यात सर्वाधिक ६ बळी घेणारा दीपक चहर हा जगातील  तिसरा गाेलंदाज ठरला आहे. यापूर्वी  अंजता मेंडिसने हा पराक्रम गाजवला आहे. त्याने दाेन वेळा अशी कामगिरी नाेंदवली आहे. त्याने ८ धावा देत ६ बळी घेतले हाेते .तर, त्यानंतर १६ धावा देत ६  विकेट काढल्या हाेत्या. आता दीपक चहरने अवघ्या ७ धावा देताना सहा विकेट काढण्याचा माेठा पराक्रम गाजवला. त्याच्या करिअरमधील हा सर्वाेत्तम कामगिरी नाेंद झाली आहे. याच्या बळावर  टीम इंडियाने मालिका विजयाची नाेंद केली.
 

शून्यावर असतानाच मिळाले जीवदान, त्यानंतर अर्धशतक
संघ संकटात असताना श्रेयस अय्यरने डाव सावरण्यासाठी कंबर कसली. यादरम्यान  त्याला शून्यावर असतानाच जीवदान मिळाले. याच संधीला सार्थकी लावताना त्याने शानदार अर्धशतक साजरे कले. सामन्याच्या पाचव्या  षटकांत फटका मारताना श्रेयसचा झेल जाणार हाेता, मात्र  तो सुटल्याने जीवदान मिळाले. त्यानंतर त्याने सुसाट खेळी करत झंझावात कायम ठेवला.