Home | Sports | From The Field | India beat pakistan in icc world cup 2019

वर्ल्डकपमध्ये भारताचा पाकिस्तानवर सलग सातवा विजय, रोहितचा षटकार; सचिनच्या आठवणींना उजाळा

दिव्य मराठी नेटवर्क, | Update - Jun 17, 2019, 10:08 AM IST

पाकविरुद्ध सलग दाेन शतके; पहिला भारतीय

 • India beat pakistan in icc world cup 2019

  मँचेस्टर - समानावीर राेहित शर्माच्या (१४०) झंझावाती २४ व्या शतकाच्या बळावर भारतीय संघाने रविवारी विश्वचषकात आपल्या पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला. भारताने डकवर्थ लुईसच्या आधारे ८९ धावांनी सामना जिंकला. यासह भारताने स्पर्धेत सलग तिसऱ्या विजयाची नाेंद केली. आता भारताचा चाैथा सामना २२ जून, शनिवारी अफगाणविरुद्ध हाेईल.

  भारताने प्रथम फलंदाजी करताना पाच गड्यांच्या माेबदल्यात पाकसमाेर ३३७ धावांचे खडतर लक्ष्य ठेवले हाेते. पावसाच्या व्यत्ययामुळे पाकला ४० षटकांत ३०२ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. प्रत्युत्तरात पाकला सहा गडी गमावून २१२ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह पाकचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पाकला उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी विजयाची गरज हाेती.


  भारताचा माेठा स्काेअर : भारताचा विश्वचषकाच्या इतिहासात पाकविरुद्ध हा सर्वात माेठा स्काेअर नाेंद झाला. भारताने २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये पाकविरुद्ध ३०० धावा काढल्या हाेत्या. आता सामन्यात राेहित शर्मा चमकला.

  वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदा शतकी भागीदारीची सलामी : भारतीय संघाने विश्वचषकात पहिल्यांदा शतकी भागीदारीची सलामी दिली. भारताच्या राेहित शर्मा आणि लाेकेश राहुलने पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली. यासह आेपनिंग जाेडीने भारताच्या नावे या शतकी भागीदारीतून विक्रमाची नाेंद केली. यापूर्वी १९९६ च्या वर्ल्डकपमध्ये सचिन आणि सिद्धूने पहिल्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी रचली हाेती.


  राेहित-काेहलीने सावरले : भारताच्या सलामीवीर राेहित शर्माने लाेकेश राहुलसाेबत दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर त्याने कर्णधार विराट काेहलीसाेबत दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी रचली. दरम्यान, राेहित शर्माने आपले शानदार वनडेचे २४ वे शतक साजरे केले. तसेच काेहलीने शानदार ७७ धावांची खेळी केली. यासह त्याला संघाच्या धावसंख्येला गती दिली. यासह भारताने सामन्यात पाकसमाेर धावांचा डाेंगर उभा केला.

  रोहित शर्माचे आता सर्वाधिक षटकार नाेंद
  रोहित शर्माचे आंतरराष्ट्रीय सामन्यात आता सर्वाधिक ३५८ षटकार झाले. असे करणारा ताे पहिला भारतीय ठरला. त्यापाठाेपाठ धाेनी (३५५) दुसऱ्या स्थानी आहे. राेहित शर्माने सलग पाचव्या वनडेत ५०+ धावांचा स्काेअर केला. अशा प्रकारची कामगिरी करणारा ताे भारताचा पाचवा फलंदाज ठरला. यापूर्वी सचिन, राहुल द्रविड, काेहली (दाेन वेळा) आणि अजिंक्य रहाणेने असा पराक्रम गाजवला आहे.


  पंचांनी केली आमिरची दाेन वेळा कानउघाडणी
  वेगवान गाेलंदाज आमिरला पंचांनी दाेन वेळा पिचवर धावण्यासाठीची ताकीद दिली. ताे गाेलंदाजी करताना फाॅलाे-थ्रूमध्ये पिचच्या प्राेटेक्टेड एरियात पाय ठेवत हाेता. त्याला पंचांनी तिसऱ्या व पाचव्या षटकात वर्तनात सुधारणा करण्याचा इशारा दिला.

  रोहितचा षटकार; सचिनच्या आठवणींना उजाळा
  भारताचा सलामीवीर राेहित शर्माने सामन्यात जरा वेगळ्या शैलीत षटकार ठाेकला. त्यामुळे त्याने २००३ च्या विश्वचषकात सचिनने सेंच्युरियनच्या मैदानावर मारलेल्या षटकाराची आठवण करून दिली. सचिनने या ठिकाणी पाकिस्तानविरुद्ध असा उत्तुंग षटकार ठाेकला हाेत. यादरम्यान सचिनने आपल्या मॅच विनिंग ९८ धावांच्या खेळीत पाक गाेलंदाज अख्तरच्या चेंडूवर हा एेतिहासिक षटकार मारला हाेता. आता या सामन्यात राेहितने २७ व्या षटकात हसन अलीच्या वाइड शाॅर्ट चेंडूवर पाॅइंटच्या वरून कट करताना षटकार ठाेकला.

 • India beat pakistan in icc world cup 2019
  रोहितचा षटकार; सचिनच्या आठवणींना उजाळा

Trending