आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशापट्टणम कसोटीत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी विजय; घरच्या मैदानावर सलग पाचव्यांदा केला पराभव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क - भारताने दक्षिण आफ्रिकेचा तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात 203 धावांनी पराभव केला. विशाखापट्टणम येथे पाचव्या आणि शेवटच्या दिवशी रविवारी आफ्रिका संघाचा दुसऱ्या डाव 191 धावांवर आटोपला. भारताने घरच्या मैदानावर आफ्रिकेवर सलग पाचव्या सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही संघातील दुसरा कसोटी सामना 10 ऑक्टोबरपासून पुण्यात खेळला जाणार आहे. 
 
सामन्याच्या पाचव्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा संघ 1 गडी 11 धावांपासून खेळण्यात मैदानात उतरला. आश्विनने थिउनिस डी ब्रुईनला तंबूत पाठवत आफ्रिकेला पहिला झटका दिला. यानंतर आफ्रिकेचा एकही फलंदाज धावपट्टीवर टीकू शकला नाही. मोहम्मद शमीने 5, रविंद्र जडेजा 4 आणि रविचंद्रन आश्विनने एक गडी बाद केला. भारताने आपला पहिला डाव 502/7 धावा तर दुसरा डाव 323/4 धावांवर घोषित केला होता. तर दक्षिण आफ्रिकेला आपल्या डावात 431 धावांपर्यंत मजल मारता आली होती. आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावात 395 धावांची आवश्यकता होती. मात्र आफ्रिकेचा दुसरा डाव 191 धावांवर आटोपला. 
 

अश्विनने केली मुरलीधरनसोबत  बरोबरी 
थिउनिस डी ब्रुईन 10 धावा करून आश्विनच्या चेंडूवर आउट झाला. अश्विनने कसोटी क्रिकेटमधील 350 विकेट पूर्ण केल्या आहेत. आपल्या 66 व्या सामन्यात हा पराक्रम केला. संयुक्तपणे सर्वात कमी कसोटी सामन्यात 350 बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. यापूर्वी श्रीलंकेचा ऑफ स्पिनर मुथय्या मुरलीधनरने 66 सामन्यांत 350 गडी बाद केले होते. 
 

मोहम्मद शमीने पाचव्यांदा पाच गडी बाद केले
मोहम्मद शमीने टेम्बा बवुमाला शून्यावर आउट केले. फाफ डुप्लेसिस 13 आणि क्विंटन डीकॉक खाते न उघडताच शमीच्या चेंडूवर त्रिफळा उडाला. यानंतर शमीने डेन पीट आणि कगिसो रबाडाला तंबूत पाठवले. शमीने गेल्या वेळी डिसेंबर 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच गडी बाद केले होते. 

रोहितने पहिल्या डावात 176 आणि दुसऱ्या डावात 127 धावा केल्या
रोहित शर्माने सलग दुसऱ्या डावात शतक झळकावलं. 127 धावा करून रोहित बाद झाला. त्याने पहिल्या डावात 176 धावा केल्या होत्या. पुजाराने आपले 21 वे अर्धशतक झळकावलं. तो 81 धावा करून बाद झाला. रोहित आणि पुजाराने दुसऱ्या विकेटसाठी 169 धावांची भागीदारी केले. 

बातम्या आणखी आहेत...