आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​हैदराबाद टेस्ट : भारताने विंडीजचा 10 विकेटने केला पराभव, घरच्या मैदानावर सलग 10 वी सिरीज जिंकली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
​हैदराबाद - भारताने रविवारी विंडीजविरुद्धच्या दोन टेस्टची सिरीज 2-0 ने जिंकली. भारताने दुसऱ्या टेस्टमध्ये वेस्टइंडीजला 10 विकेटने पराभूत केले. मागील पाच वर्षांमध्ये भारताने घराच्या मैदानावर ही सलग दहावी सिरीज जिंकली आहे. आठ वेळेस टेस्टमध्ये 10 विकेटने सामना जिंकला आहे. मॅचमध्ये 10 विकेट घेणारा खेळाडू उमेश यादवला मॅन ऑफ द मॅच देण्यात आले. या व्यतिरिक्त डेब्यू टेस्टमध्ये शतक करणारा तरुण फलंदाज पृथ्वी शॉ मॅन ऑफ द सिरीज ठरला. या टेस्टमध्ये भारताला विजयासाठी 72 धावांचे आव्हान होते, जे 16.1 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता पूर्ण केले. पृथ्वी शॉ आणि के एल राहुल  33-33 धावा काढून नाबाद राहिले. तिसऱ्या दिवशी 98 ओव्हर टाकण्यात आल्या. या दरम्यान 261 धावा झाल्या आणि 16 विकेट गेल्या.

बातम्या आणखी आहेत...