आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने विश्व विजेत्या वेस्टइंंडीजला सलग तिसऱ्या मालिकेत हरवले, 67 धावांनी मिळवला विजय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : भारताने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत वेस्टइंडीजला २-१ ने हरवले. मुंबईत झालेल्या तिसऱ्या व अखेरच्या टी-२० मध्ये टीम इंडियाने ६७ धावांनी विजय मिळवला. टी-२० जागतिक विजेता विंडीजला भारताने सलग तिसऱ्या टी-२० मालिकेत मात दिली. यापूर्वी भारताने याच वर्षी आणि गेल्या वर्षी विंडीजला टी-२० मध्ये हरवले आहे.

विंडीजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली. रोहित शर्मा (७१) व लोकेश राहुलने भारताला ११.४ षटकांत १३५ धावांची सलामी दिली. रोहितने २३ व राहुलने २९ चेंडूंत अर्धशतक ठोकले. विराट २९ चेंडूंत ७० धावांवर नाबाद राहिला. त्याने राहुल सोबत ९५ धावांची भागीदारी केली. राहुलचे (९१) शतक हुकले. भारताने २० षटकांत ३ बाद २४० धावा काढल्या. ही भारताची टी-२० मध्ये तिसरी सर्वोत्कृष्ठ धावसंख्या ठरली. सर्वोत्कृष्ट २६० धावांची खेळी आहे.

प्रत्युत्तरात, विंडीजची सुरुवात खराब झाली व टीमने १७ धावांत ३ गडी गमावले. त्यानंतर कर्णधार केरॉन पोलार्ड व शिमरन हेटमायरने ७४ धावांची भागीदारी करत डाव सावरला. हेटमायर (४१) बाद झाला. पोलार्डने ३९ चेंडूत ६८ धावा काढल्या. कुलदीप, भुवनेश्वर, चाहर व शमी यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.

रोहित षटकार खेचण्यात तिसऱ्या स्थानी पोहोचला
 

खेळाडू  : डाव : षटकार*
क्रिस गेल : 530 : 534
शाहिद आफ्रिदी : 508 : 476
रोहित शर्मा : 360 : 404


* तिन्ही प्रकारांत एकूण षटकार

विराट व रोहितच्या समान धावा
 
- विराट कोहली आणि रोहित शर्माच्या टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सारख्या धावा झाला. दोघांच्या २६३३ धावा आहेत. विराटने ७५ व रोहितने १०४ टी-२० खेळले.
- कोहलीने भारतात एक हजार आंतरराष्ट्रीय टी-२० धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे.
- विराटसह न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिल व कोलिन मुनरोचा घरच्या मैदानावर हजार धावा.
- रवींद्र जडेजाच्या जागी शमीचा समावेश. कारण - यंदा आयपीएलमध्ये वानखेडवर ७ सामने होतील. यात वेगवान गोलंदाजांना ६२ बळी मिळाले, फिरकीपटूंना १६ बळी.
- आतापर्यंत ९ वेळा ३ द्विपक्षीय टी-२० मालिकेत भारताने निर्णायक सामना ८ वेळा जिंकला.

धावफलक नाणेफेक वेस्ट इंडीज (गोलंदाजी)
 

भारत : धावा : चेंडू : ४ : ६
 
रोहित झे. वॉल्श गो. विलियम्स : ७१ : ३४ : ०६ : ५
राहुल झे. पूरन गो. कोट्रेल : ९१ : ५६ : ०९ : ४
पंत झे. होल्डर गो. पोलार्ड : ०० : ०२ : ०० : ०
विराट कोहली नाबाद : ७० : २९ : ०४ : ७
श्रेयस अय्यर नाबाद : ०० : ०० : ०० : ०

अवांतर : ०८. एकूण : २० षटकांत ३ बाद २४० धावा. 

गडी बाद हाेण्याचा क्रम : १-१३५, २-१३८, ३-२३३. 

गाेलंदाजी : कोट्रेल ४-०-३४-१, जेसन होल्डर ४-०-५४-०, के. पियरे २-०-३५-०, विलियम्स ४-०-३७-१, वॉल्श ४-०-३८-०, पोलार्ड २-०-३३-१.

वेस्ट इंडीज : धावा : चेंडू : ४ : ६
सिमन्स झे. अय्यर गाे. शमी : ०७ : ११ : ०१ : ०
किंग झे. राहुल गो. कुमार : ०५ : ०४ : ०१ : ०
हेटमेयर झे. राहुल गो. कुलदीप : ४१ : २४ : ०१ : ५
पूरन झे. दुबे गो. चाहर : ०० : ०१ : ०० : ०
पोलार्ड सब. जडेजा गो. कुमार : ६८ : ३९ : ०५ : ६
होल्डर झे. पांडे गो. कुलदीप : ०८ : ०५ : ०१ : ०
वॉल्श त्रि. गो. शमी : ११ : १३ : ०१ : ०
पियरे सब. जडेजा गो. चाहर : ०६ : १२ : ०० : ०
विलियम्स नाबाद : १३ : ०७ : ०१ : १
कोट्रेल नाबाद : ०४ : ०४ : ०१ : ०

अवांतर : १०. एकूण : २० षटकांत ८ बाद १७३ धावा. 

गडी बाद हाेण्याचा क्रम : १-१२, २-१७, ३-१७, ४-९१, ५-१०३, ६-१४१, ७-१५२, ८-१६९. 

गाेलंदाजी : दीपक चाहर ४-०-२०-२, भुवनेश्वर कुमार ४-०-४१-२, मो. शमी ४-०-२५-२, शिवम दुबे ३-०-३२-०, कुलदीप यादव ४-०-४५-२, वाॅशिंग्टन सुंदर १-०-५-०.