आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

150 वनडे जिंकणारा भारत ठरला जगातील चाैथा संघ 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अँटिग्वा - सलामीच्या पराभवातून सावरलेल्या भारतीय महिला संघाने साेमवारी यजमान विंडीज संघाचा घरच्या मैदानावरील मालिका विजयाचा प्रयत्न हाणून पाडला. भारताच्या महिला संघाने दुसऱ्या वनडे सामन्यात विंडीजला धूळ चारली. भारतीय संघाने ५३ धावांनी सामन्यात धडाकेबाज विजयाची नाेंद केली. भारताचा हा करिअरमधील वनडे सामन्यातील १५० वा विजय ठरला आहे. यासह भारताने सर्वाधिक विजयांमध्ये चाैथ्या स्थानावर धडक मारली. सर्वाधिक २५८ वनडे सामने आॅस्ट्रेलिया महिला संघाने जिंकले आहेत. तसेच इंग्लंडचा महिला संघ (२०२ ) दुसऱ्या आणि न्यूझीलंड संघ (१७०) तिसऱ्या स्थानावर आहे. भारताने चाैथे स्थान गाठले.  आता विजयासह भारताच्या महिला संघाने दाैऱ्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बराेबरी साधली आहे. आता मालिकेतील तिसरा आणि निर्णायक वनडे सामना उद्या बुधवारी खेळवला जाणार आहे. यजमान विंडीज संघाने सलामी सामना जिंकून मालिकेमध्ये आघाडी मिळवली हाेती. त्यानंतर ही लय कायम ठेवताना मालिका विजयाचा टीमचा मानस हाेता. मात्र, भारताच्या महिला संघाने हा प्रयत्न उधळून लावला.  भारताने निर्णायक असलेल्या दुसऱ्या वनडेत प्रथम फलंदाजी करताना ६ गड्यांच्या माेबदल्यामध्ये विंडीजसमाेर विजयासाठी १९२ धावांचे टार्गेट ठेवले हाेते. प्रत्युत्तरामध्ये विंडीजच्या संघाला घरच्या मैदानावर ४७.२ षटकांत अवघ्या १३८ धावांवर गाशा गुंडाळावा लागला. यासह विंडीजचा मालिका विजयाचा प्रयत्न अपयशी ठरला. 

पूनमचा झंझावात : भारताकडून प्रिया (५) व जेमिमा (०) स्वस्तात बाद झाल्या. त्यानंतर पूनम राऊतने (७७) झंझावाती खेळी करताना संघाचा डाव सावरला. तिने कर्णधार मितालीसाेबत (४०) तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. भागीदारी केली. 

बातम्या आणखी आहेत...