आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलायका अरोराला अभिनयात काही रस नाही, परंतु जेम्स बाँड चित्रपटाची ऑफर मिळाल्यास नक्कीच विचार करणार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क (किरण जैन) : सध्या मलायका अरोरा 'इंडियाज बेस्ट डान्सर' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून दिसत आहे. मलायकाच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही ती बर्‍याच रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे. तथापि, हा पहिला असा कार्यक्रम आहे जिथे ती फक्त एकच टॅलेंट जज करेल आणि तो म्हणजे डान्स. यापूर्वी, ती 'झलक दिखला जा' आणि 'इंडियाज गॉट टॅलेंट'चा एक भाग होती. अलीकडेच दिव्यमराठीसोबत झालेल्या चर्चेदरम्यान मलायकाने या शोशी संबंधित काही गोष्टी शेअर केल्या. त्याने तिने तिचे फिटनेस सीक्रेट्सही शेअर केले.

मलायकाने या गोष्टी केल्या शेअर 

यापूर्वी  मी सेलिब्रिटी बेस्ड रिअॅलिटी शो केले आहेत. 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये अनेक प्रतिभा असलतात. त्यामुळे ब-याच वर्षांनी मी रिअल डान्स रिअॅलिटी शो जज करतेय, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.  अर्थात नक्कीच दबाव असेल. चांगली गोष्ट म्हणजे या शोमध्ये सर्वच मोठे स्पर्धक आहेत, लहान मुले नाहीत. माझ्यावर विश्वास ठेवा मुलांना जज करणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. तसेच, गेल्या कित्येक वर्षांपासून सोलो कंटेस्टंट बेस्ट रिअॅलिटी शो टेलिव्हिजनवर दिसला नाही. आतापर्यंत, कपल किंवा ग्रुप बेस्ड शो आलेत, परंतु हा सोलो आहे. थोडक्यात, मी हा शो नाकारण्याचे कारण नव्हते.


गीता कपूर आणि टेरेन्स हे माझ्यासह या शोचे जज आहेत. हे दोघेही आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे स्पर्धकांच्या डान्सिंग टेक्निक्सची जबाबदारी आहे. माझे मत काय आहे हे महत्वाचे असले तरी मी त्यांच्याशी अजिबात वाद घालत नाही. मी खूप भावनिक व्यक्ती आहे. प्रेक्षक स्क्रीनवर माझ्या ज्याही भावना पाहतात मग ते रडणे असो, किंवा हसणे ते अजिबात स्क्रिप्टेड नसते. तसेच, मी करमणूक व्यवसायात आहे, त्यामुळे मी स्पर्धकांकडूनही करमणुकीची अपेक्षा करते. मला वाटते की आपण आपल्या आयुष्यात काहीही करू शकतो, आपण जगातील सर्वोत्कृष्ट डान्सर बनलोे  आणि जर आपल्याकडे एंटरटेन्मेंट व्हॅल्यू नसेल तर डान्समध्ये तुम्ही झिरो ठरता. माझे मनोरंजन करण्याची जबाबदारी या स्पर्धकांची असेल.


मला पर्सनली डान्स करणे खूप पसंत आहे. संधी मिळताच मी कुठेही नृत्य करण्यास सुरवात करते. माझ्यासाठी नृत्य हे एक मनोरंजनाचे माध्यम आहे. अलीकडेच सेटवर एक स्पर्धक परफॉर्म करताना बघून मीही ताल धरला होता.
बरेच लोक आमच्या परीक्षणावर टीका करतात. पण मी त्याकडे लक्ष देत नाही. जसे मी म्हणाले की मी एक भावनिक व्यक्ती आहे आणि मी खूप लवकर रडू येते. माझे इमोशन्स बनावट असल्याचे कोणी म्हणू शकत नाही. मी दगडाने बनलेली नाही? असे नाही की मला टीकाकारांना घाबरते. माझा विश्वास आहे की, केवळ समालोचनामुळेच आपण पुढे जाऊ शकतो, स्वत:ला चांगले बनवू शकतो. परंतु आपण कोणावर किती टीका करता, यावर मर्यादा असणे आवश्यक आहे. मी लोकांना काही सल्ला देखील देते, आता ते कसे घ्यावे हे त्यांच्यावर अवलंबून असते. 


मला अभिनयाची आवड नाही. आतापर्यंत अनेक चित्रपटांच्या ऑफर मला आल्या आहेत. होय, जर जेम्स बाँड चित्रपटाची ऑफर आली तर मी नक्कीच विचार करेन. मी माझ्या चेलिव्हिजन करिअरमध्ये आनंदी आहे, त्यामुळे अभिनयाचा मला विचार करता आला नाही.


मी माझ्या तब्येतीबाबत खूपच पर्टिकुलर आहे. मी स्वत: गीता आणि टेरेन्सला उपवास करायला भाग पाडले आहे.  सेटवर, ते मला माझ्या फिटनेसबद्दल विचारत असतात आणि मी त्यांना ज्ञान देण्यासदेखील चुकत नाही. मी गेल्या एक वर्षापासून अधूनमधून उपवास करत आहे, ज्यामुळे माझे आरोग्य खूप चांगले झाले आहे. एक मोठा फरक माझ्यात दिसतोय. ज्यामुळे मी खूप समाधानी आहे. माझ्यासाठी फिटनेस हा माझ्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. केवळ शारीरिक फिटनेसच नव्हे तर मानसिक आणि भावनिक फिटनेसही महत्त्वाचा असतो. मी तीच गोष्ट गीता आणि टेरेन्सला सांगितली आणि दोन आठवड्यांपर्यंत अधून मधून उपवास करण्याचा सल्ला दिला. 

मी बाहेरचे पदार्थ अजिबात खात नाही, फक्त घरचे जेवण करते. माझ्या आजूबाजूच्या प्रत्येकाला हे माहित आहे. तसेच, मी जेवणाच्या वेळेबद्दल खूपच पर्टिकुलर आहे. काहीही झाले तरी मी खायला वेळ काढते. मला पाहून गीता आणि टेरेन्ससुद्धा हे फॉलो करत आहेत. ते किती यशस्वी आहेत ते पाहूया. हे एक आव्हान आहे.


काही वर्षांपूर्वी मी योगाशी जुळले होते आणि त्यानंतर मी योगाच्या प्रेमात पडले. एक दिवसही योगाशिवाय जात नाही. मी सूर्यनमस्काराने सुरुवात करते आणि मग ध्यान करते. योगाने माझ्या आयुष्यात बदल घडवून आणला.
 

बातम्या आणखी आहेत...