आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने यंदा 25 खेळाडू अाजमावले; यापेक्षा जास्त श्रीलंकेसाठी खेळले!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय संघ अाता तब्बल दाेन महिन्यांसाठी अाॅस्ट्रेलियाच्या दाैऱ्यावर रवाना झाला अाहे. भारताचा संघ या दाैऱ्यात यजमान अाॅस्ट्रेलियाविरुद्ध क्रिकेटच्या तिन्ही फाॅरमॅटमधील मालिका खेळणार अाहे. यातील  क्रिकेटच्या झटपट फाॅरमॅट टी-२० च्या मालिकेला २१ नाेव्हेंबरपासून सुरुवात हाेईल. त्यामुळे या मालिकेने या दाैऱ्याला सुरुवात हाेईल. टीम इंडियाने नुकतीच पाहुण्या विंडीजविरुद्धची टी-२० मालिका जिंकली अाहे. त्यामुळे या  विजयाने भारतीय संघाचा अात्मविश्वास द्विगुणीत झालेला अाहे.

 

काॅम्बिनेशनच्या प्रयाेगासाठीचा कालावधी निघून गेल्याची प्रतिक्रिया मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिली. त्यामुळेच अाता इंग्लंडमध्ये पुढच्या वर्षी हाेणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी भारताच्या टीममध्ये कमीत कमी बदल हाेण्याचे संकेत अाहेत. पुढच्या वर्षी इंग्लंडमध्ये वनडेचा वर्ल्डकप हाेणार अाहे. 

 

२० सामन्यांसाठी २५ खेळाडू अाजमावले
टीम  इंडियाने सत्रात २० सामने खेळले. यासाठी  २५ खेळाडू अाजमावले अाहेत. यापेक्षा अधिक खेळाडूंना झिम्बाब्वे (२९) व श्रीलंकेने(२६) संधी दिली. अाॅस्ट्रेलिया, बांगलादेश अाणि दक्षिण अाफ्रिकेच्या संघानेही भारताच्या बराेबरीने प्रत्येकी २५ खेळाडू सत्रात अाजमावले अाहेत, तर पुढच्या वर्षी वनडे वर्ल्डकप खेळणाऱ्या पाकने २२, विंडीजने २३, इंग्लंडने २१, अफगाणिस्तानने १९ अाणि न्यूझीलंडने १७ खेळाडूंना संधी दिली.

 

धाेनीच्या फाॅर्मवर प्रश्नचिन्ह कायम 

सध्या टीम इंडियाच्या माजी कर्णधार महेंद्रसिंग धाेनीच्या फाॅर्मवर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह अाजही कायम अाहे. त्यामुळे त्याला यादरम्यान अापल्या कामगिरीचा दर्जा उंचावण्याची गरज अाहे. त्याने सत्रातील २० सामन्यांत २७५ धावा काढल्या. म्हणजेच सरासरी २५ धावा झाल्या. त्याने दीर्घ काळापासून माेठी अशी खेळी केली नाही. सिक्सर किंग मानल्या जाणाऱ्या धाेनीने या सत्रात केवळ दाेनच षटकार ठाेकले.  

 

वर्ल्डकपपूर्वीचे १३ वनडे  भारतीय संघ खेळणार 
> दिनांक        > प्रतिस्पर्धी    >मैदान
 
- १२ जानेवारी    अाॅस्ट्रेलिया    सिडनी  
- १५ जानेवारी    अाॅस्ट्रेलिया    अॅडिलेड  
- १८ जानेवारी    अाॅस्ट्रेलिया    मेलबर्न  
- २३ जानेवारी    न्यूझीलंड    नेपियर  
- २६ जानेवारी    न्यूझीलंड    माऊंगानुई  
- २८ जानेवारी    न्यूझीलंड    माऊंगानुई  
- ३१ जानेवारी    न्यूझीलंड    हॅमिल्टन  
- ३ फेब्रुवारी    न्यूझीलंड    वेलिंग्टन  
- २४ फेब्रुवारी    अाॅस्ट्रेलिया    माेहाली  
- २७ फेब्रुवारी    अाॅस्ट्रेलिया    हैदराबाद  
- २ मार्च    अाॅस्ट्रेलिया    नागपूर  
- ५ मार्च    अाॅस्ट्रेलिया    दिल्ली  
- ८ मार्च    अाॅस्ट्रेलिया    रांची  

 

 

बातम्या आणखी आहेत...