आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Brazil Terrorism, Role On Climate Change, Bilateral Talks With Brazil's President Before Republic Day

भारत-ब्राझील यांची दहशतवाद, हवामान बदलावर भूमिका समान, प्रजासत्ताक दिन संचलनाआधी ब्राझीलच्या राष्ट्रपतींसाेबत माेदींची द्विपक्षीय चर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताला देण्यासाठी आमच्याकडे खूप काही
  • उभय देशांत सायबर सुरक्षेसह 15 करार, आयुर्वेद, हाेमिओपॅथी, भूगर्भ विज्ञानाचा समावेश

​​​​​​नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून भारत भेटीवर आलेले ब्राझीलचे राष्ट्रपती जॅर बाेलसाेनाराे यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यासमवेत शनिवारी द्विपक्षीय चर्चा केली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेत सायबर सुरक्षेसह १५ प्रकारचे करार झाले. चर्चेत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व एनएसए अजित डाेभाल उपस्थित हाेते. यानिमित्ताने पंतप्रधान माेदी म्हणाले, दाेन्ही देश भलेही हजाराे किलाेमीटर दूर असतील, परंतु दहशतवाद व हवामान बदलाच्या मुद्द्यावर समान भूमिका आहे.

माेदी पुढे म्हणाले, विकासात परस्परांना महत्त्वपूर्ण भागीदार मानले जाते. यापुढे वेगवेगळ्या क्षेत्रात रणनीतीच्या पातळीवरदेखील भागीदार बनवायचे, असा निर्णय आम्ही घेतला. त्यासाठी कार्ययाेजना तयार आहे. २०२३ मध्ये दाेन्ही देशांच्या राजकीय संबंधाची ७५ वर्षे पूर्ण हाेतील. ताेपर्यंत ही कार्ययाेजना आमच्या रणनीतीविषयक भागीदारीला जास्त दृढ बनवेल, अशी अपेक्षाही माेदी यांनी व्यक्त केली. ब्राझीलचे राष्ट्रपती बाेलसाेनाराे म्हणाले, रविवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलनासाठी उत्सुक आहे. आम्ही भारताच्या प्रगतीत याेगदान देणाऱ्या देशांपैकी आहाेत. भारताला देण्यासाठी आमच्याकडे खूप काही आहे. भारतही आम्हाला खूप काही देऊ शकताे. दरवर्षी ५८ हजार काेटी रुपयांचा व्यापार आर्थिक मंदीतून वाटचाल करणाऱ्या दाेन्ही देशांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाताे. लॅटिन अमेरिकी देशांमध्ये २१ काेटी लाेकसंख्या व १२८ लाख काेटी रुपयांच्या अर्थव्यवस्था असलेला ब्राझील, भारताचा सर्वात माेठा भागीदार आहे. २०१८-१९ मध्ये दाेन्ही देशांत सुमारे ५८ हजार काेटी रुपयांचा व्यापार झाला हाेता. त्यापैकी भारताकडून २७ हजार काेटींच्या निर्यातीचाही समावेश आहे. त्यात पेट्राे उत्पादने, सिंथेटिक यार्न, आॅटाे पार्ट््सचाही समावेश आहे. ब्राझीलकडून भारतात साेने, कच्चे तेल, खाद्यतेल यासह इतर सामानाचाही पुरवठा केला जाताे. भारतीयांनी ब्राझीलमध्ये सुमारे ४२ हजार काेटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ब्राझीलच्या लाेकांनी भारतात ७ हजार काेटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

तिसरे राष्ट्रपती

भारताच्या प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे बनणारे बाेलसाेनाराे हे ब्राझीलचे तिसरे राष्ट्रपती ठरले आहेत. त्यांच्या आधी १९९६ ते २००४ मध्ये ब्राझीलचे राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य संचालन कार्यक्रमाचे पाहुणे हाेते.

करार असे 

पेट्राेलियम पदार्थांत इथेनाॅलच्या मिश्रणासंबंधी आैद्याेगिक हस्तांतरण, नैसर्गिक तेल, जैविक इंधन, देशी गाईंच्या प्रजातीचे संवर्धन, गुन्हेगारी प्रकरणात सहकार्य, आराेग्य-आैषधी, आयुर्वेद तसेच हाेमिअोपॅथी, सांस्कृतिक, सायबर सुरक्षा, वैज्ञानिक व तंत्रज्ञान, भूगर्भ विज्ञान तसेच खनिज संसाधन, पशुपालन-डेअरी, गुंतवणूक सहकार्य, सुविधा संधी, गुंतवणूक व व्यवसाय वाढवण्यासाठी संस्थेची स्थापना.
 

बातम्या आणखी आहेत...