• Home
  • Gossip
  • India came out of the World Cup, Adnan Sami said, 'We are proud of you ...' Pakistani fans trolling him

Bollywood / वर्ल्ड कपमधून भारत बाहेर झाला तर अदनान सामी म्हणाला, 'आम्हाला तुमच्यावर गर्व आहे...' पाकिस्तानी फॅन्स करत आहेत ट्रोल 

पाक फॅन्स अदनानला म्हणाले, 'आयएसआय एजंट'  

दिव्य मराठी वेब

Jul 11,2019 01:11:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : भारत काल विश्व कप सेमीफाइनलमधून बाहेर झाला. बुधवारी न्यूझीलंडने 18 धावांनी हा सामना जिंकला. टीम इंडियाला वर्ल्ड कप चॅम्पियन बनण्याचा प्रबळ दावेदार मानले जात होते. वर्ल्ड कपमध्ये भारत टॉप पोजीशनवर होता. पण एका पराजयामुळे भारत स्पर्धेतून बाहेर झाला आहे. भारताला हरवून से न्यूझीलंड आता सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचला आहे. भारताच्या अशा पराजयामुळे सर्वच प्रेक्षक नाराज झाले. पण या पराभवानंतर पाकिस्तानमध्ये सिंगर अदनान सामी सध्या टॉप ट्रेंड करत आहे. त्यांना पाक फॅन्स आयएसआय एजेंट (ISI Agent) आणि पाक मेजर म्हणत आहेत.

झाले असे की, टीम इंडिया स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर अदनान सामीने ट्वीट करून लिहिले, 'आम्हाला तुमच्यावर गर्व आहे टीम इंडिया. आज तुमचा दिवस नव्हता. अनेक महान लोकांचा पराभव होत असतो. आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही अनेक सामने जिंकले आहेत आणि आम्हाला प्राउड फील करवले आहे. तुम्ही खूप चांगले खेळलात. खूप सारे प्रेम आणि प्रार्थना.' अदनान सामीच्या या ट्विटमुळे त्याला सर्व पाक फॅन्स ट्रोल करत आहेत.

X
COMMENT