आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-इंग्लंड दुसरी कसोटी : भारताला पुनरागमनासाठी करावी लागेल चार वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- एजबेस्टनमध्ये पहिली कसोटी हरल्यानंतर टीम इंडिया लाॅर्ड््सच्या ऐतिहासिक मैदानावर दुसऱ्या कसोटीत इंग्लंशी सामना करण्यास सज्ज झाली आहे. भारतीय संघाला मालिकेत पुनरागमन करण्यासाठी २०१४ मध्ये केलेल्या कामगिरीची पुनारावृत्ती करावी लागेल. चार वर्षांपूर्वी भारतीय टीमने लॉर्ड््सच्या हिरव्यागार खेळपट्टीवर इंग्लंडला ९५ धावांनी पराभूत केले होते. तेव्हा अजिंक्य रहाणेने शानदार शतक झळकावले होते आणि ईशांत शर्माने ४ गडी बाद केले होते. 


या कसोटीत भारताला फलंदाजीची सर्वात मोठी चिंता आहे. पहिल्या कसोटीत कर्णधार विराट कोहली वगळता इतर सर्व फलंदाज अपयशी ठरले. विराटने पहिल्या कसोटीत दोन्ही डाव मिळून २०० धावा केल्या. संघातील इतर १० फलंदाजांनी मिळून २१४ धावा काढल्या. अशा कामगिरीमुळे संघाला विजय मिळवणे कठीण आहे. फलंदाजीची समस्या दूर करण्यासाठी अंतिम अकरात काही बदल केले जाऊ शकतात. चेतेश्वर पुजारा मैदानावर परतू शकतो. पुजाराने बुधवारी नेटमध्ये सराव केला. शिखर धवनने विश्रांती घेतली. पुजाराची निवड जवळपास निश्चित आहे. त्याचप्रमाणे अजिंक्य राहणे व लाकेश राहुलने चिन तेंडुलकरची फोनवरून चर्चाकरून मार्गदर्शन घेतले. 


एजबेस्टनमध्ये पांड्याने पहिल्या डावात १० षटके गोलंदाजी केली आणि दुसऱ्या डावात त्याने एकही षटक टाकले नाही. तो आपली अष्टपैलू कामगिरीची जबाबदारी पार पाडू शकला नाही. फलंदाजीतही तो एजबेस्टन कसोटीत अपयशी ठरला. 


भारतीय टीम मंगळवारी लंडनमध्ये ब्रिटिश हायकमिशनतर्फे आयोजित मेजवानीत सहभागी झाली होती. यादरम्यान विराट कोहलीसोबत त्याची पत्नी अनुष्का शर्मादेखील उपस्थित होती. बीसीसीआयने टीमचे छायाचित्र शेअर केल्यावर अनुष्काला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. तिची उपस्थिती अधिकृत आहे की, नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. संघातील इतर कोणत्याही खेळाडूची पत्नी येथे उपस्थित नव्हती. 


संघ पुढीलप्रमाणे 
भारत - विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, करुण नायर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, उमेश यादव, इशांत शर्मा, मोहमंद शमी, चेतेश्वर पुजारा, शार्दूल ठाकूर. 
इंग्लंड : ज्यो रुट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेयरस्टो, स्टुअर्स ब्रॉड, जोस बटलर, अॅलिस्टर कुक, सॅम कुरन, कटीन जेनिंग्स, ओली पोप, जॅमी पोर्टर, अादिल राशीद, वोक्स. 


पोपला संधी ? 
इंग्लंडने आपली १३ सदस्यीय टीम जाहीर केली. त्यात ब्रिस्टल प्रकरणाच्या सुनावणीमुळे बेन स्टोक्सचा समावेश करण्यात आलेला नाही. डेव्हिड मलानच्या जागी युवा खेळाडू ओली पोपचा समावेश करण्यात आला. पोप कसोटीत पदार्पण करू शकतो. स्टोक्सची जागा क्रिस वोक्स भरून काढेल. 


लॉर्ड््सवर शतक : सचिनही करू शकला नाही, विराटला संधी 
प्रत्येक कसोटी फलंदाजाचे तीन स्टेडियमवर खेळायचे आणि शतक झळकावयाचे हे स्वप्न असते. लंडनमधील लॉर्ड््स, ऑस्ट्रेलियातील मेलबर्न, भारतातील ईडन गार्डन ही स्टेडियम आहेत. विराटने मेलबर्न आणि ईडन गार्डनवर शतके ठोकली आहेत. लॉर्ड््सवर एक कसोटी खेळला असून तो शतकापासून वंचित आहे. लॉर्ड््सवर दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरदेखील शतक झळकावू शकलेला नाही. 

बातम्या आणखी आहेत...