घसरण : डिसेंबर / घसरण : डिसेंबर तिमाहीमधील आर्थिक विकास दर केवळ 6.6 टक्क्यांवर

भारताचा विकास दर ऑक्टोबर-डिसेंबर २०१८ दरम्यान ६.६ टक्के नोंदवण्यात आला

Mar 01,2019 11:23:00 AM IST

नवी दिल्ली - सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी मोदी सरकारसाठी नकारात्मक बातमी आली आहे. भारताचा विकास दर ऑक्टोबर-डिसेंबर २०१८ दरम्यान ६.६ टक्के नोंदवण्यात आला. हा मागील सहा तिमाहींतील सर्वात कमी आहे. या आधी एप्रिल ते जून २०१७ मध्ये ६.९ टक्के विकास दर नोंदवण्यात आला होता. वर्षभरापूर्वी समान तिमाहीमध्ये अर्थव्यवस्था ७.७ टक्क्यांनी वाढली हाेती. देशांतर्गत आणि निर्यातीसाठीची मागणी कमी झाल्याने ही घसरण नोंदवण्यात आली आहे. ग्राहकी खर्च जीडीपीच्या जवळपास ५७ टक्के आहे. यातील वाढ कमी होऊन ८.४ टक्क्यांवर आली आहे, जी एक तिमाहीपूर्वी ९.९ टक्के होती. रिझर्व्ह बँकेने या वर्षीसाठी ७.४ टक्के विकास दराचा अंदाज वर्तवला होता. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने (सीएसओ) गुरुवारी ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे.


तरीही तेजीने वाढ
विकास दर कमी झाल्यानंतरही जगातील सर्वात तेजीने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताचे स्थान कायम राहणार आहे. मागील तिमाहीत चीनचा विकास दर ६.४% होता. अमेरिकेतील अर्थव्यवस्था २०१८ मध्ये २.९% वाढली होती. ही १३ वर्षांतील सर्वाधिक तेजी आहे. २०१७ मध्ये विकास दर २.२ टक्के होती.

X