आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-जर्मनीदरम्यान संरक्षण, नदी स्वच्छता, शिक्षणासह 17 करार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जर्मनीच्या चान्सलर मर्केल दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर, मोदींची घेतली भेट
  • मोदी-मर्केल यांनी पाचव्या आयसीजे बैठकीत आपल्या देशाचा दहशतीसाठी वापर करू न देण्याचा संकल्प केला

नवी दिल्ली : जर्मनीच्या चान्सलर अंगेला मर्केल ३ दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी गुरुवारी रात्री उशिरा भारतात पोहोचल्या. शुक्रवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हैदराबाद हाऊसमध्ये भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी पाचव्या इंटर गव्हर्नमेंटल कन्सल्टेशन (आयजीसी) बैठकीत भाग घेतला. त्यानंतर आपल्या देशाचा दहशतीसाठी वापर करू न देण्याचा संकल्प करत पाकिस्तानला संदेश दिला. दोन्ही नेत्यांनी दहशतवादाच्या धोक्यांशी सामना करण्यासाठी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्य वाढवण्याचा संकल्प केला. भारत आणि जर्मनी यांच्यात १७ करार करण्यात आले. तसेच दोन्ही देशांनी ५ संयुक्त घोषणापत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. करारानुसार १०८ उपनिषदांचे जर्मन भाषेत अनुवाद करण्यात येईल. तसेच जर्मन साहित्याचा अनुवाद हिंदी आणि संस्कृतमध्ये करण्यात येईल. मोदींनी जर्मन चान्सलर यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आणि त्यांना भारताचा चांगला मित्र म्हटले. ते म्हणाले की, अंगेला मर्केल केवळ युरोपच नव्हे तर संपूर्ण जगात दीर्घ काळापासून देशाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्या आहेत. मर्केल पूर्ण जगातील कणखर नेत्या आहेत.

17 करार झाले.... अंतराळ, नागरी उड्डाण, स्मार्ट सिटी नेटवर्क, कौशल्य विकास, स्टार्ट अप्स, शेती, तंत्रज्ञान, आरोग्य, रुग्णांचे पुनर्वसन, नदी स्वच्छता, सागरी तंत्रज्ञान, वैज्ञानिक सहकार्य, आयुर्वेद, योग तसेच ध्यान, उच्च शिक्षण, निरंतर विकास, संस्कृती, फुटबॉल, व्हिसा, ट्रान्सपोर्ट.

मैत्री: दोघांची एका वर्षात पाचवी भेट
जर्मन चान्सलर अंगेला मर्केल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एका वर्षातील ही पाचवी भेट आहे.

मर्केल २००५ पासून चान्सलर, प्रकृतीमुळे आता जास्त वेळ उभे राहू शकत नाहीत
६५ वर्षाच्या मर्केल २००५ पासून जर्मनीच्या चान्सलर आहेत. युरोपीय युनियनच्या सर्वात शक्तीशाली नेत्या मानल्या जातात. त्या युनियनच्या देशांमध्ये सर्वात जास्त काळी सत्ता करणाऱ्या महिलाही आहेत. याआधी केवळ हेल्मुट कोल दीर्घ काळ जर्मनीच्या चान्सलर होत्या. मर्केल काही काळापासून आजारी आहेत. यामुळे त्या जास्त काळ उभ्या राहू शकत नाहीत.

दोन्ही देशांमधील नाते लोकशाही व्यवस्थेवर आधारित : मोदी
मोदींनी सांगितले की, आमच्या दोन्ही देशांमधील नाते लोकशाही आणि कायद्यावर आधारीत आहेत. यामुळेच जगातील मोठ्या आणि गंभीर मुद्यांवर आमचे विचार एक सारखे आहेत. ते म्हणाले की, जर्मनीने निर्यात नियंत्रण क्षेत्रात भारताच्या सदस्यत्वाचे समर्थन केल्याबद्दल आभारी आहोत. दोन्ही देशांमधील सहकार्य रहावे यासाठी प्रयत्न सुरू राहतील. त्यांनी मर्केल यांनी सांगितले की, भारताच्या संरक्षण कॉरिडॉरमध्ये जर्मनीच्या व्यावसायिकांनी लाभ घ्यावा अशी अपेक्षा आहे. भारत आणि जर्मनीचे लक्ष नवे आणि प्रगत तंत्रज्ञान, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, स्किल्स, शिक्षणाबाबत सहकार्य वाढवण्यावर आहे.

जास्त भारतीय विद्यार्थ्यांनी जर्मनीत यावे ही आमची इच्छा: मर्केल
मर्केल यांनी सांगितले की, जर्मनीत २० हजार भारतीय विद्यार्थी शिकताहेत. आमची ईच्छा आहे की, त्यांची संख्या वाढावी. व्होकेशनल ट्रेनिंगसाठी टीचर्स एक्स्चेंज प्रोग्राम सुरू व्हावा असे आम्हाला वाटते. हवामान बदल आणि स्थिर विकासाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवायचे आहे. मर्केल म्हणाल्या की, दोन्ही देशांमध्ये मजबूत संबंध आहेत.