National / भारताला स्विस बँकेतील खातेधारकांची पहिली यादी मिळाली, यातील अनेक खाते कारवाईच्या भीतीने बंद केले

स्विट्जरलंडने भारतासोबत कराराअंतर्गत सीबीडीटीला खात्यांची माहिती दिली

दिव्य मराठी वेब

Sep 08,2019 10:07:00 PM IST

नवी दिल्ली- स्विट्जरलंड सरकारने स्विस बँकेत भारतीय खातेधारकांची पहिली यादी भारताला सोपवली आहे. बँक आणि सीबीडीटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मिळालेल्या सूचनांचे आकलन केले जात आहे. या लिस्टमध्ये बहुतेक खाते असे आहेत, जे कारवाईच्या भीतीने बंद करण्यात आले आहेत. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या खात्यांची विशेष तपासणी केली जाणार आहे. भारत आणि स्विट्जरलंड दरम्यान बँकिंग करारानंतर 1 सप्टेंबरपासून भारतीयांची स्विस बँक खात्यांची माहिती उपलब्ध केली जात आहे.


वृत्तसंस्थेला मिळालेल्या माहितीनुसार, स्विट्जरलंड सरकारच्या निर्देशावर परदेशी बँकांनी भारतीय खातेदारांशी निगडीत सर्व डेटा तयार केला आहे. यात त्या सगळ्या खात्यांची माहिती सामील आहे, जे 2018 नंतर एक दिवसांसाठीही सक्रिय झाले आहेत. या माहितीच्या आधारे स्विस बँकेंच्या खात्यांमध्ये अघोषित संपत्ती ठेवणाऱ्या विरुद्ध कारवाईत मदत मिळेल.

100 भारतीयांचे खाते 2018 पूर्वी बंद झाले
भारतीयांचे 100 असे खातेदेखील सामील आहेत, ज्यांना 2018 पूर्वी बंद करण्यात आले आहेत. स्विस सरकारने या खात्यांची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे खाते ऑटो पार्ट्स, केमिकल, टेक्सटाइल, रिअल इस्टेट, हीरा आणि स्टील प्रोडक्टशी निगडीत व्यावसायिकांचे आहेत. तसेच, राजकारणाशी संबंधित व्यक्तींच्या खात्यांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.


X
COMMENT