आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात झपाट्याने वाढत आहे श्रीमंतांची संख्या, \'या\' बाबतीत जगाला टाकले पीछाडीवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली :  देशामध्ये श्रीमंतांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. पण श्रीमंतांची संख्याच वाढत नसून त्यांच्या संपत्तीत वेगाने वाढ होत आहे. 2016 मध्ये  भारतातील धनाढ्य लोकांची 2 लाख 84 हजार 140 इतकी होती. तर 2021 मध्ये हीच संख्या 86 टक्क्यांनी वाढून 5 लाखांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट इंडेक्सच्या  2018 मार्फत करण्यात आलेल्या एका अभ्यासात वर्तवण्यात आला आहे. 


दुपटीने वाढणार संपत्ती

एका अहवालानुसार 2016 मध्ये देशातील श्रीमंतांकडे एकूण 95 लाख कोटी रूपयांची संपत्ती होती. तर 2021 पर्यंत हाच आकडा दुपटीने वाढून 188 लाख कोटी रूपये होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशातील 55 टक्के लोकांना ही संपत्ती वडिलोपार्जित मिळाली आहे. तर जगभरात हाच आकडा 34 टक्के आहे. याबाबत स्वतःचे नशीब लिहीण्यात भारत मागे असल्याचे दिसून येते. पण 45 टक्के भारतीयांनी स्वतःच्या बळावर संपत्ती उभारली आहे. तर विश्वातील 66 टक्के लोकांनी स्वबळावर संपत्ती उभारली आहे. 


भारतात व्यवसायिक, उद्योजक आणि व्यापारांची संख्या जास्त 

87 टक्के अतिश्रीमंत भारतीय व्यवसायिक, उद्योजक आणि व्यापारी आहेत. याबाबतीत मात्र जगभरातील सरासरी 52 टक्के आहे. इकोनॉमिक टाइम्सच्या बातमीनुसार अनेकांना त्यांची संपत्ती वडिलोपार्जित मिळाली आहे पण त्यांनी ती आतापर्यंत टिकवून ठेवली आहे. आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंटचे सीईओ भगत यांनी सांगितले की, भारतामधील श्रीमंतांची संख्या मागील पाच वर्षांमध्ये 40 टक्क्यांनी वाढली आहे. जगाच्या तुलनेमध्ये ही सरासरी खूपच जास्त आहे. तसेच याबाबती भारत वेगाने प्रगती करत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...