आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने रिलायन्स या एकाच कंपनीचे नाव दिले होते; फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वां ओलांद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राफेल विमानांच्या करारासाठी भारताने केवळ अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स या एकाच कंपनीचे नाव दिले हाेते, असे फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वां ओलांद यांनी म्हटल्याचे फ्रंेच माध्यमांनी म्हटले आहे. 


मीडियापार्ट या वेबसाइटने ओलांद यांच्या मुलाखतीचे वृत्त देताना या वृत्ताला ओलांद यांचा हवाला दिला. यानुसार, ओलांद यांनी म्हटले आहे की, 'आमच्या हातात काहीही नव्हते. भारत सरकारने या कंपनीचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार अनिल अंबानी यांच्या कंपनीसोबत चर्चा झाली. आमच्याकडे पर्याय नव्हता. ज्या कंपनीचे नाव आम्हाला दिले गेले त्याच कंपनीची आम्ही निवड केली.' 


केंद्र सरकारमध्ये अस्वस्थता
ओलांद यांच्या वक्तव्यामुळे केंद्र सरकारमध्ये अस्वस्थता पसरली आहे. राफेल विमान करारात भारत किंवा फ्रान्स सरकारची काहीच भूमिका नाही, असा दावा आजपर्यंत केंद्र सरकार करत होते. 


देशाची फसवणूक केली 
पंतप्रधानांनी बंद दाराआड सौदा करून राफेल करारच बदलला. ओलांद यांचे आभार... आता आम्हाला कळले की दिवाळखोरीत असलेल्या अनिल अंबानी यांना पंतप्रधानांनी अब्जावधी डॉलरची भेट दिली. हा सैनिकांचा अवमान आहे. 
- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष 

बातम्या आणखी आहेत...