आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Has 12 Lac Lac Deaths Every Year Due To Polluted Air, 120th In The List Of 122 Countries In Terms Of Pure Water

भारतात दूषित हवेमुळे दरवर्षी 12 लाख लाेकांचा मृत्यू, शुद्ध पाण्याच्या बाबतीत 122 देशांच्या यादीत 120 वा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पर्यावरण, शिक्षण आणि प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटी
  • केवळ 1.5% पदवीधर अभियंते व्यावसायिकदृष्ट्या कुशल
  • इकाॅनाॅमिस्टने भारतासाठी तीन समस्या घातक असल्याचे म्हटले त्याचा हा विस्तृत रिपाेर्ट

भारतातील मूलभूत सुविधांचा पाया डळमळीत झाला अाहे. गरिबी अाणि विषमता सर्वव्यापी बनली अाहे. अाराेग्य सेवा व्हेंटिलेटरवर तर अर्थव्यवस्था काेंडीत सापडली अाहे. जर पर्यावरण, शिक्षण अाणि प्रशासकीय व्यवस्थेतील त्रुटी दूर करता अाल्या तर स्थितीत सुधारणा हाेऊ शकते. जगातील सर्वाधिक प्रदूषित १५ पैकी १२ शहरे भारतात अाहेत. दूषित वायूमुळे दरवर्षी १२ लाख नागरिक दगावतात. पाण्याच्या शुद्धतेच्या निर्देशांकाचा विचार करता १२२ देशांच्या क्रमवारीत १२० वे स्थान मिळाले अाहे. शिक्षणावर जीडीपीच्या केवळ ४% खर्च हाेताे. ब्रिटिशकालीन प्रशासकीय व्यवस्था अाजही कायम अाहे, यामध्ये पायाभूत बदल अद्याप झालेला नाही. पंजाब, हरियाणातील पठारी प्रदेश अाता अाेळखणेही शक्य नाही. दरवर्षी शेतकरी पऱ्हाट्या पेटवून देतात. हिवाळ्यात दाट धुके पसरते. उत्तर भारताशिवाय पाकिस्तानच्या लाहाेरपासून बांगलादेशच्या ढाक्यापर्यंत डिझेलच्या धुराचे, अाैष्णिक विद्युत केंद्रातून उत्सर्जित हाेणाऱ्या विषारी वायूचे, राखेचे लाेट पाहायला मिळतात. सरासरी मानवी अायुष्य चार वर्षांनी कमी हाेत अाहे. अशुद्ध पाण्यामुळे दरवर्षी दाेन लाख लाेक मृत्युमुखी पडतात. सांडपाणी, प्रदूषणकारी घटकांच्या गटारांचे व्यवस्थित जाळे बनवण्यास सरकार फारसे प्राधान्य देत नाही, मात्र त्याएेवजी माेठी धरणे अाणि कालव्यांची उभारणी अग्रक्रमाने करीत असते. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या सरकारने पर्यावरण सुधारणेसाठी ठाेस पावले उचलली असली तरी फारसा परिणाम दिसून अालेला नाही. २००५ नंतर चीनसहित जगभरातील अन्य देशांमध्ये कार्बन डायअाॅक्साइडचे उत्सर्जन कमी झाले, मात्र भारतात ते दुपटीने वाढले अाहे. भारतातील दाेन तृतीयांश लाेकसंख्या ग्रामीण भागात राहते. चीनमध्ये ही संख्या ४१% अाहे. 'असर'च्या अहवालानुसार देशभरातील पाचव्या इयत्तेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर दुसरीच्या वर्गातील मुलांच्या बराेबरीचा अाहे. तर केवळ १.५% अभियंते डेटासारख्या क्षेत्रात काम करण्यासाठी कुशल अाहेत. २०१० नंतर ही स्थिती अद्याप बदललेली नाही. कार्तिक मुरलीधरन अाणि अभिजित सिंह या दाेन अर्थतज्ञांच्या मते या समस्येचे समाधान केवळ अधिक खर्चात करण्यात नाही, तर त्यासाठी भारतीय शिक्षणाची संस्कृती अाणि अाकृतिबंध बदलण्याची गरज अाहे. सध्या शाळांचे लक्ष काैशल्य किंवा मूल्यशिक्षणाएेवजी परीक्षा उत्तीर्ण करण्याकडे अधिक अाहे. सेंटर फाॅर पाॅलिसी रिसर्चच्या यामिनी अय्यर यांच्या मते, संपूर्ण शिक्षण प्रणाली अध्यापन कार्याएेवजी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासह पायाभूत बाबींच्या सभाेवताल कार्यरत असते. मिलन वैष्णव यांच्या मते, २१ व्या शतकातील भारतात १३ व्या शतकातील राज्यव्यवस्था प्रचलित अाहे. भारतीय प्रशासकीय सेवेत केवळ पाच हजार सक्रिय अधिकारी अाहेत. पूर्ण क्षमतेसाठी १५०० अधिकारी अजून हवेत.

७०% भूजल दूषित
सारा देश मान्सूनवर अवलंबून असला तरी पाण्याचा जपून वापर पाहायला मिळत नाही. भारतातील सुमारे ७०% भूजल दूषित अाहे. दाेन काेटी कूपनलिकांचे भूजल धाेक्याच्या पातळीपेक्षाही खाली गेलेले अाहे. अमेरिका, चीनच्या तुलनेत भारतीय शेतकरी पाण्याचा अधिक प्रमाणात वापर करतात. भारतात १ किलाे तांदळाच्या उत्पादनासाठी ६ हजार लिटर पाणी लागते, मात्र चीनमध्ये ६०० लिटरमध्ये इतकाच तांदूळ घेतला जाताे.
 

बातम्या आणखी आहेत...