आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतामध्ये चीनपेक्षा जास्त थिंक टँक, एक वर्षात 293 हून वाढून 509 वर, अमेरिकेचे 1871 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- भारतात चीनच्या तुलनेने जास्त थिंक टँक आहेत. 'चायना डेली' ने अमेरिकेच्या ग्लोबल गो टू थिंक टँक अहवाल-२०१८ च्या हवाल्याने हा दावा केला आहे.अहवालानुसार अमेरिकेत सर्वात जास्त १८७१ एवढे थिंक टँक आहेत. त्यामुळे अमेरिका अव्वल स्थानी आहे. त्यानंतर भारत-५०९, चीन-५०७ थिंक टँक आहेत. २०१७ च्या तुलनेत अमेरिकेत २०१८ मध्ये एक थिंक टँक कमी झाला आहे. अमेरिकेत २०१८ मध्ये १८७२ थिंक टँक होते. अमेरिकेत २०१७ मध्ये सर्वात जास्त थिंक टँक होते.धक्कादायक गोष्ट म्हणजे भारतात २१६ थिंक टँक केवळ एकाच वर्षात वाढले आहेत. २०१७ मध्ये भारतात २९३ थिंक टँक होते. या दरम्यान चीनमध्ये थिंक टँकची संख्येत मात्र घट झाली. २०१७ मध्ये चीनकडे ५१२ थिंक टँक होते. तेव्हा चीन या क्षेत्रात जगात दुसऱ्या क्रमांकावर होता तर भारत चौथ्या क्रमांकावर होता. २०१८ मध्ये भारतातील ही संख्या वाढली. चीनमध्ये मात्र त्यात घट झाली. क्रमवारीत अव्वल दहा थिंक टँकमध्ये पहिले पाच अमेरिकेचे आहेत. ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूटश्नल पहिल्या क्रमांकावर आहे. फ्रान्सचे इंटरनॅशनल रिलेशन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेचे कार्नेगी इंटोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस तिसऱ्या क्रमांकावर आहे. अव्वल १० क्रमवारीत भारत व चीनचा एकही थिंक टँक जागा पटकावू शकलेला नाही. 

 

लॉडर इंस्टीट्यूट ऑफ यूनिवर्सिटी 
अमेरिकेतील पेन्साल्व्हिनियातील लॉडर इन्स्टिट्यूट आॅफ युनिव्हर्सिटी ग्लोबल गो टू थिंक टँक अहवाल जारी करते. हा अहवाल विद्यापीठाच्या थिंक टँक अँड सिव्हिल सोसायटिज प्रोग्रॅमचा भाग आहे. ग्लोबल गो टू थिंक टँक अहवालासाठी जगातील १०० शहरांतील केंद्र माहितीचे संकलन करतात. अहवालाद्वारे विकासासाठी आवश्यक सल्लाही दिला जातो. 
 

बातम्या आणखी आहेत...