आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताला आठ वर्षांपासून सुवर्ण नाही; मेरी कोमला 7 पदकांच्या विक्रम रचण्याची संधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली -  महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या सामन्यांना गुरुवारपासून दिल्लीमध्ये सुरुवात होत आहे. २४ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या स्पर्धेत ७३ देशांचे ३०० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी होत आहेत. भारतीय खेळाडू २०१० पासून आतापर्यंत या चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकू शकले नाहीत. अशात यजमान भारतीय खेळाडू स्पर्धेत ८ वर्षांचा पदकांचा दुष्काळ दूर करू शकतात. दिल्लीत २००६ मध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने सर्वाधिक ४ सुवर्णांसह ८ पदके जिंकली होती. हे भारताचे आतापर्यंतचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन राहिले. मेरी कोम व आयर्लंडची केटी टेलरने जागतिक स्पर्धेत सर्वाधिक ६-६ पदके जिंकली आहेत. मेरी कोम अव्वल तीनमध्ये  राहिल्यास ७ पदके जिंकणारी जगातील पहिली खेळाडू ठरले.   


भारतीय संघ : मेरी कोम (४८ किलो),  पिंकी जांगडा (५१), मनीषा (५४), सोनिया (५७), सरिता देवी (६०), सिमरनजीत (६४ किलो), लोवलिना (६९), स्विटी (७५), भाग्यबती (८१), सीमा पुनिया (+८१).

 

पाच वर्षे सलग कमीत कमी एक सुवर्ण 
२००१ पासून महिला गटात जागतिक चॅम्पियनशिपला सुरुवात झाली. पहिल्या स्पर्धेत एमसी मेरी कोमने भारताला पहिले (रौप्य)पदक जिंकून दिले. त्यानंतर पुढील ५ स्पर्धेत आपण कमीत कमी एक सुवर्णपदक जिंकले. अखेरच्या वेळी भारताला २०१० मध्ये मेरी कोमनेे सुवर्ण दिले होते. त्यानंतर २०१२, १०१४ आणि २०१६ मध्ये आपले खेळाडू सुवर्ण जिंकू शकले नाहीत. भारताचे २०१२ मध्ये सर्वात खराब प्रदर्शन राहिले, तेव्हा केवळ एका कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

 

7 सुवर्ण रशियाने २००५ मध्ये जिंकले होते. एका स्पर्धेतील सर्वाधिक सुवर्ण जिंकण्याचा विक्रम.
4 वेळा रशियाच्या संघाने सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली, चीनने दोनदा अशी कामगिरी केली.

१२ पदके जिंकले होते रशियाने २००२ मध्ये. एका स्पर्धेत कोणत्याही देशाचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन. 

२१ सुवर्णपदकांसह रशिया अव्वल देश आहे. एकूण ५३ पदके जिंकली आहेत.  

बातम्या आणखी आहेत...