आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India Has To Wait Another 5 Years For Five G Due To Insufficient Resources: Claims By Companies

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपुऱ्या स्रोतांमुळे भारतात फाइव्ह जीसाठी 5 वर्षे आणखी वाट पाहावी लागेल : कंपन्यांचा दावा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • समस्या सीओएआय म्हणाले, जास्त बेस प्राइस तसेच अपुऱ्या स्पेक्ट्रममुळे सध्या फाइव्ह जी शक्य नाही
  • 1 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमची किंमत 492 काेटी रुपये

​​​​​​नवी दिल्ली : भारतीय माेबाइल कंपन्या देशात फाइव्ह जी नेटवर्क सेवा सादर करण्याची याेजना ५ वर्षांसाठी टाळू शकतात. कंपन्या यासाठी खूप जास्त बेस प्राइस, अपुरे स्पेक्ट्रम आणि नवीन बँड्सची अनुपलब्धता ही कारणे देत आहेत. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, सेल्युलर ऑपरेटर्स असाेसिएशन ऑफ इंडिया(सीओएआय)चे संचालक जनरल राजन एस. मॅथ्यू म्हणाले, आम्ही ५ जी कमीत कमी पाच वर्षांसाठी लांबणीवर टाकत आहाेत. देशातील ऑपरेटर्सचा हा दृष्टिकाेन आहे. त्यांनी हेही सांगितले की, सुरुवातीस शुल्काची अडचण हाेती. यानंतर अन्य समस्याही आहेत. सीओएआय देशातील सर्व खासगी दूरसंचार कंपन्या भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्हाेडाफाेन आयडियाचे प्रतिनिधित्व करतात. यासाेबत हुवावे, एरिक्सन, सिस्काे आणि सिएनासारख्या उपकरण निर्मात्या कंपन्याही याचा भाग आहेत. त्यांनी सांगितले की, प्रायसिंग या उद्याेगासाठी सुरुवातीच्या समस्येच्या रूपात समाेर आली आहे. १ मेगाहर्ट्झची किंमत ४९२ काेटी रुपये आहे. आंतरराष्ट्रीय किमती आणि कर्जाचा स्तर पाहता बहुतांश कंपन्यांना वाटते की, एवढी माेठी रक्कम चुकवणे शक्य नाही. सध्या कंपन्यांना मिळून केवळ १७५ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम उपलब्ध आहेत.

सर्व कंपन्यांना मिळून देण्यासाठी केवळ १७५ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम उपलब्ध

प्रत्येक ऑपरेटरला मिळावेत १०० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम


मॅथ्यूज यांनी सांगितले की, भारतात जेवढ्या ५ जी स्पेक्ट्रम सादर केले जात आहेत ते पुरेसे आहेत. उद्याेगाची मागणी आहे की, प्रत्येक ऑपरेटरला १००-१०० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमचे वाटप व्हावे. त्यांनी सांगितले की, दूरसंचार कंपन्यांशिवाय अन्य संस्थांनाही यात हिस्सेदारी हवी आहे. २५ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम स्पेसशी संबंधित कामांसाठी आहे. यासाेबत १०० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम संरक्षणासाठी आहेत. अशा पद्धतीने १७५ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमची उपलब्ध आहेत.

एरिक्सनचाही सेवा सुरू करण्यासाठी दोन वर्षांच्या विलंबाचा अंदाज


काही दिवसांपूर्वी भारतात ५ जी सेवेची सुरुवात २०२० किंवा २०२१ पर्यंत सुरू हाेऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला हाेता. दूरसंचार उपकरण निर्माती कंपनी एरिक्सननेही आपल्या अंदाजात प्रथम सांगितले हाेते की, २०२० पर्यंत भारतात ५जी सबस्क्रिप्शनची सुरुवात हाेईल. मात्र, सद्य:स्थिती पाहता स्वीडनच्या या कंपनीने आपल्या अंदाजास दाेन वर्षांसाठी वाढवली आहे. आता २०२२ पर्यंत भारतात ५जीची शक्यता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी सीअाेएआयच्या वक्तव्यानंतर निश्चित मुदत गाठणे साेपे नाही.

शिक्षण, आरोग्य, वाहतुकीसारख्या अनेक क्षेत्रांत मागे राहण्याचा धोका


५जीला अनेक दूरसंचार तज्ञ क्रांतिकारी तंत्रज्ञान मानतात. ही पूर्णपणे लागू झाल्यानंतर तंत्रज्ञान आपले आयुष्य जगण्याच्या पद्धतीत बऱ्याच अंशी बदलण्याची क्षमता ठेवते. ड्रायव्हरलेस कार, राेबाेटिक सर्जरी, रिमाेट सर्जरी, डिस्टन्स लर्निंगसारख्या क्षेत्रात वेगवान वृद्धीसाठी ५जी आवश्यक मानले जाते. मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठीही ५जी महत्त्वाचे आहे. आगामी वर्षांत राेजगाराच्या माेठ्या संधी मिळतील. अशा स्थितीत पाच वर्षांचा विलंब भारतीय तरुणाईला चीन, अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांतील तरुणाईच्या तुलनेत मागे ढकलू शकते.
 

सेवा विलंबाने सुरू केल्यामुळे तंत्रज्ञान क्रांतीत खूप मागे राहू शकतो भारत


चीनच्या तीन दूरसंचार कंपन्या चायना माेबाइल, चायना युनिकाॅर्न आणि चायना टेलिकाॅमने आपल्या देशात ५जी सेवा सुरू केली आहे. या कंपन्यांनी परवाना मिळण्याच्या पाच महिन्यांच्या आत ही सेवा सुरू केली आहे.चीनच्या ५० शहरांत १८ डाॅलर(सुमारे १२८७ रु.) प्रतिमहा दरावर ही सेवा सुरू केली आहे.

दक्षिण काेरियामध्ये एसके टेलिकाॅमने या वर्षी एप्रिलमध्येच फाइव्हजीची स्मार्टफाेनसाठी सेवा लाँच केली हाेती. कंपनी २०१७ पासून फाइव्हजीची चाचणी करत हाेती. ब्रिटनमध्येही अनेक सेवा पुरवठादाराने सेवा सुरू केली आहे. संपूर्ण देशात याच्या विस्तारासाठी तेथे वेगाने काम चालू आहे.

जर्मनीमध्ये व्हाेडाफाेनसह २ सेवा प्रदात्यांनी अनेक शहरांत ५ जी सेवा करू केली अमेरिकेत एटीअँडटी आणि व्हेरिझाेनने काही शहरांत ५ जी सेवेची सुरुवात केली आहे. डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड, नाॅर्वेसारखे देश वेगात काम करत आहेत. त्यामुळे भारत शिक्षण, वाहतूक यासारख्या क्षेत्रांत मागे पडण्याचा धाेका आहे.
 

बातम्या आणखी आहेत...