आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Has Won Seven Consecutive Series Win Against The West Indies For 12 Years!

विंडीजविरुद्ध भारताच्या नावे 12 वर्षांपासून सलग 7 मालिका विजय!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- यजमान भारत अाणि विंडीज यांच्यातील तिसरा वनडे सामना अाज शनिवारी पुण्याच्या मैदानावर हाेणार अाहे. सलामीचा वनडे  जिंकून भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. त्यानंतर या दाेन्ही संघातील दुसरा वनडे सामना बुधवारी टाय झाला. त्यामुळे  अाता भारताची नजर तिसऱ्या वनडे सामन्यावर लागली अाहे. यातून भारताला अापली  विजयी लय कायम ठेवता येईल. तसेच भारताला अाघाडीही घेता येणार अाहे.   


भारताने अातापर्यंत १२ वर्षांपासून कॅरेबियन टीमविरुद्ध सलग सात वनडे मालिका जिंकल्या अाहेत. विंडीजने अापल्या घरच्या मैदानावर टीम इंडियाविरुद्ध शेवटचा मालिका विजय २००६ मध्ये मिळवला हाेता. यादरम्यान भारताने १-४ ने ही मालिका गमावली हाेती. त्यामुळे अाता मालिका विजयाची अापली माेहीम कायम ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. यासाठी यजमान भारताचे युवा खेळाडू सज्ज झाले अाहेत. सध्या टीमचा कर्णधार विराट काेहलीही जबरदस्त फाॅर्मात अाहे. त्यामुळे टीमलाही मालिकेत दुसरा विजय मिळवून देण्याचा त्याचा मानस अाहे. त्यामुळे पुण्याच्या मैदानावर विंडीजला फाॅर्मात असलेल्या यजमान भारताला राेखण्याचे माेठे अाव्हान असेल. गत सामन्यात विंडीजच्या युवांना चिवट खेळी केली. त्यामुळे टीमला अापला पराभव टाळता अाला. तसेच भारताचा विजयाचा प्रयत्नही यशस्वीपणे हाणून पाडता अाला. 

 

१६ वर्षांपासून विंडीज संघाला अाहे भारतात विजयाची प्रतीक्षा :  
पाहुण्या विंडीज संघाला अाता भारतात विजयाची अाशा अाहे. मागील १६ वर्षांपासून यासाठी विंडीजचा संघ प्रचंड मेहनत घेत अाहे. त्यामुळे अाता हा विजयाचा दुष्काळ दूर करण्याचा विंडीजच्या टीमचा प्रयत्न असेल. या टीमने भारतात शेवटचा विजय २००२-०३ मध्ये मिळवला हाेता. यादरम्यान विंडीजने यजमान भारतविरुद्धच्या सात वनडे सामन्यांच्या मालिकेत ४-३ ने बाजी मारली हाेती. कार्ल हुपरच्या नेतृत्वात विंडीजला हे यश संपादन करता अाले. अाता हाेल्डरच्या नेतृत्वात विंडीजचा संघ या यशाच्या शाेधात अाहे. 


हेटमेयरचा स्ट्राइक रेट अाहे सर्वाधिक 
पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या विंडीजचा विजयासाठी संघर्ष सुरू अाहे. यासाठी टीमचा हेटमेयर सरस खेळी करत अाहे. त्याने दाेन सामन्यात प्रत्येकी एका शतक अाणि अर्धशतकाच्या अाधारे २०० धावा काढल्या. यादरम्यान त्याची सरासारी १४१ अाहे. ही या स्पर्धेतील सर्वाधिक ठरली. 

 

नंबर वन बुमराह, भुवनेश्वरमुळे संघाचे विजयाचे पारडे जड

संघात अाता भुवनेश्वर कुमार अाणि जगातील नंबर वन जसप्रीत बुमराहदेखील मैदानावर उतरणार अाहेत. त्यामुळे भारताचे या सामन्यातील विजयाचे पारडे जड मानले जाते. या दाेघांकडून टीमला माेठी अाशा अाहे. बुमराह सध्या चांगलाच फाॅर्मात अाहे. त्याची सत्रातील कामगिरीही काैतुकास्पद ठरली. त्यामुळे अाता तिसऱ्या वनडेसाठी त्याला खास संधी देण्यात अाली. अाता निवड समितीचा विश्वास सार्थकी लावण्याचा त्याचाही प्रयत्न असेल. तसेच भुवनेश्वर कुमारकडूनही टीमला माेठ्या खेळीचा विश्वास अाहे.

बातम्या आणखी आहेत...